सयाजीराजे वॉटर पार्कमधील राइडने घेतला बिझनेसमनचा जीव, फिरता पाळणा तुटला अन्...
सोलापूरच्या अकलूज येथे असलेल्या सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये फिरता पाळणा तुटून झालेल्या अपघातात एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना

फिरता पाळणा तुटल्याने भीषण अपघात

दुर्घटनेत एका उद्योजकाचा मृत्यू, 2 जण जखमी
नितीन शिंदे, अकलूज: सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील अम्युझमेंट पार्कमधील फिरत्या पाळणा कोसळून एका उद्योजकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. अम्युझमेंट पार्कमध्ये वेगात फिरणारा पाळणा अचानक निसटून खाली पडला आणि त्यात उद्योजक तुषार धुमा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं वॉटरपार्कमध्ये?
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात पाळण्यातील तिघेजण जखमी झाल्याची माहिती आहे. वेगाने फिरणाऱ्या पाळण्यामध्ये तुषार धुमाळ यांच्यासह आणखी दोघे जणही होते. ज्यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असून तुषार धुमाळ यांचा मात्रा मृत्यू झाला.
हे ही वाचा>> पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या नावाखाली सुरू होतं भलतंच...
भिगवण येथील व्यावसायिक असलेले तुषार धुमाळ हे पाळणा कोसळून झालेल्या अपघातात अत्यंत गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. धुमाळ हे भिगवण येथील नावाजलेले एलआयसी (LIC) उद्योजक आहेत. दरम्यान, अपघातातील इतर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मालकीचे हे वॉटर पार्क असून दुर्दैवाने आज येथील पाळण्याच्या झालेल्या अपघातात तुषार धुमाळ यांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, या घटनेमुळे वॉटर पार्कमध्ये भीती आणि आक्रोश पसरला. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यावरून या अपघाताची तीव्रता लक्षात येते.