पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या नावाखाली सुरू होतं भलतंच...

मुंबई तक

Pune Crime News : पुण्यातील बुधवार पेठेत वेश्यव्यवसायाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा केला आहे.

ADVERTISEMENT

pune crime news drug racket in the name of prostitution in Pune's Budhwar Peth
pune crime news drug racket in the name of prostitution in Pune's Budhwar Peth
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील बुधवार पेठेत एक अंमली पदार्थांची तस्करी

point

जाणून घ्या नेमकं प्रकरण

Pune Crime News : पुण्यातील बुधवार पेठेत वेश्यव्यवसायाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा केला आहे. या घटनेत तस्करी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि हिट अॅन्ड रनसारख्या अनेक घटना घडत आहेत. त्यानंतर आता पुण्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  

हेही वाचा : आधी पतीला भेटली, नंतर OYO हॉटेलमध्ये भलत्याच पुरुषासोबत गेली; पण दिराने सगळा खेळच...

वेश्यव्यवसायाच्या नावाखाली पुण्यात ड्रग्स रॅकेट 

पुण्याच्या बुधवारपेठेत आक्का या नावाने ओळखली जाणारी एक महिला सेक्स वर्कर ग्राहकांना मेफेड्रोन पुरवत असल्याचे आढळून आलं, यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपीचे नाव ज्योती सुनील यादव उर्फ कट्टीमणी (वय 50) असून ती महिला कात्रजची रहिवासी आहे. 

या प्रकरणात आता पोलिसांनी तपास केला असता, ती तिच्या भावासोबत मिळून संपूर्ण रॅकेट चालवत होती, अशी माहिती आता समोर आली आहे. मेफेड्रोनच्या अवैध विक्री प्रकरणात पोलिसांनी शरणप्पा कट्टीमणीला गुलबर्गा कर्नाटक येथून अटक केली आहे. 

शरणप्पाकडे अंदाजे 12.12 लाख रुपयांचे 59 ग्रॅम एमडी आढळले. चौकशीच्यादरम्यान, त्याने याबाबत कबूली दिली आहे. हे ड्रग्ज त्याच्या बहिणीनेच म्हणजेच ज्योती यादवने पुरवले होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp