आधी पतीला भेटली, नंतर OYO हॉटेलमध्ये भलत्याच पुरुषासोबत गेली; पण दिराने सगळा खेळच...
Crime News उत्तर प्रदेशातील बागपुतमध्ये एका महिलेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. महिलेच्या नातेवाईकाने तिला ओयो हॉटेलमध्ये एका पुरूषासोबत रगेहाथ पकडलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महिलेला परपुरूषासमोर दिराने रंगेहाथ पकडलं

हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?
Crime News : उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये एका महिलेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. महिलेच्या नातेवाईकाने तिला ओयो हॉटेलमध्ये एका पुरूषासोबत रगेहाथ पकडलं. ही बाब महिलेच्या लक्षात आल्यानंतर महिला हॉटेलमधून बाहेर आली आणि तिनं एका छतावर उडी मारली. या प्रकरणाचा व्हिडिओ एका तरुणाने कॅमेऱ्यात कैद केला आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा : पुरोगामी महाराष्ट्र हादरला; धार्मिक संस्थेत विद्यार्थ्याला शॉक देऊन जीवं मारलं, कारण ऐकूण अंगावर येईल काटा
मिळालेल्या माहितीनुसार, बागपत ककौर कला गावात कपिल नावाचा एक व्यक्ती राहतो. कपिलचे आपल्या पत्नीसोबत अनेकदा वाद विवाद झाले होते. कपिलने आपल्या पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. याचमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कपिलच्या पत्नीने एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर केलं आणि ती एका पुरुषासोबत एका हॉटेलवर दिसली.
कपिलने आरोप करत सांगितलं की, माझ्या पत्नीचे परपुरूषासोबत प्रेमसंबंध आहेत. मागील 6 महिन्यांपासून दोघांमध्ये अनेकदा वाद विवाद झाले होते. या प्रकरणात बागपत पोलिसांसमोर पती-पत्नीने आपापल्या बाजू मांडल्या. मात्र, यानंतर जे काही झालं ते सर्वकाही हैरान होण्यासारखंच होतं. यानंतर महिला पतीसोबत घरी न जाता आपल्या प्रियकरासोबत हॉटेलवर गेली. त्यानंतर महिलेनं छतावर उडी मारत पळ काढला पण ती तिच्या नातेवाईकांच्या तावडीत सापडली.
अखेर महिला तावडीत
काउंसलिंग झाल्यानंतर कपिल घरी जात होता. त्यावेळी कपिलसोबत त्याचा छोटा भाऊ देखील होता. छोटा भाऊ आपल्या गावाकडे येत असताना त्याने आपल्या वहिनीला एका परपुरूषासोबत पाहिलं. त्यावेळी दिराने आपल्या वहिनीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. एका अनोळखी तरुणाने आपली दुचाकी थांबवली आणि त्यानंतर महिला गाडीवर बसून एका हॉटेलमध्ये गेली. दिराने तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यानंतर दोघेही एका हॉटेलमध्ये गेले. अशावेळी दिराने वहिनीला तरुणासोबत रंगेहाथ पकडलं.
हेही वाचा : आईचं होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर, बाप लेकानं रचला कट अन्...नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?
महिलेनं आपल्या दिराला पाहताच ती पूर्णपणे भयभीत झाली. तिने त्या ठिकाणाहून पळ काढला. यादरम्यान, महिलेनं एका हॉटेलवरून छतावर उडी मारली आणि तिथून फरार झाली. छतावर उडी मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.