'बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री??', अजितदादांच्या नेत्याने Video शेअर करून वेळ साधली?

मुंबई तक

शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मंत्री भरतशेठ गोगावले यांचा एक व्हिडिओ NCP नेते सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर शेअर करून मोठी खळबळ उडवली आहे.

ADVERTISEMENT

भरतशेठ गोगावले यांचा व्हिडिओ (Video Grab)
भरतशेठ गोगावले यांचा व्हिडिओ (Video Grab)
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रातील शिंदे गटाचे नेते आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्यावर अघोरी विद्या आणि तांत्रिक पूजा करत असल्याचा गंभीर आरोप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सूरज चव्हाण यांनी आज (18 जून) अपलोड केला आहे.

या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती भगवी वस्त्रे परिधान केलेली असून, एक व्यक्ती (भरत गोगावले असल्याचा दावा केला आहे) जे खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली असून, त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा अद्यापही कायम आहे. पालकमंत्री पद मिळावं यासाठी भरतशेठ हे आग्रही आहेत. तर दुसरीकडे आदिती तटकरे यांची पालकमंत्री पदी वर्णी लागावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे. अशावेळी आता ज्या पद्धतीने सूरज चव्हाण यांनी भरतशेठ गोगावले यांचा व्हिडिओ शेअर केल्याने आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. 

नेमका व्हिडिओ काय?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती (जो गोगावले यांचा संदर्भ असल्याचे काहींनी म्हटले आहे) जी एका साधूसमोर बसलेली दिसून येत आहे. ज्याच्या समोर एका छोट्या टेबलावर काही वस्तू ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाचे पदार्थ दिसत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp