रुग्णालय परिसरात लोकांना हेरायची अन् करायची वेश्या व्यवसाय, सेक्स वर्करला नेमकं कसं पकडलं?
Prostitution Shocking Viral Story : पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा पर्दाफाश झाल्यानंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

देहव्यापार करण्यासाठी कुठे कुठे फिरायच्या त्या महिला?

रुग्णालय परिसरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

दोन सेक्स वर्कर पोलिसांच्या ताब्यात
Prostitution Shocking Viral Story : पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा पर्दाफाश झाल्यानंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छोट्या शहरांमध्येही देह व्यापार सुरु असल्याचं समोर आलं आहे. हे प्रकरण बिहारमधील कटीहार जिल्ह्यातील आहे. एका रुग्णालय परिसरात दोन महिलांना संशयित कृत्य केल्याबद्दल सिक्योरिटी गार्डने पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
देहव्यापार करण्यासाठी कुठे कुठे फिरायच्या त्या महिला?
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला मागील अनेक दिवसांपासून सदर नावाच्या रुग्णालय परिसरात ग्राहकांचा शोध घेण्यासाठी येतात. याआधीही रुग्णालय परिसरात संशयित पद्धतीने फिरताना सिक्योरिटी गार्डने त्यांना बाहेर हकलून लावलं होतं. परंतु, सोमवारी रात्री उशिरा पुन्हा त्या महिला त्याच ठिकाणी पोहोचल्या. तेव्हा सिक्योरिटी गार्डने त्यांच्याकडे चौकशी सुरु केली. चौकशी दरम्यान महिलांनी कबूल केलं की, ते शहराच्या वेगवेगळ्या रहिवासी परिसरात, गल्लीत आणि फोरलेन रस्त्यांवर देहव्यापार करण्यासाठी फिरतात.
हे ही वाचा >> मुंबईत तुफान पावसाला सुरुवात, पुढचे 3-4 तास धोक्याचे.. हवामान खात्याकडून Alert जारी
प्रति ग्राहक 300 ते 500 रुपये मिळतात
महिलांनी सांगितलं की, त्यांना प्रति ग्राहक 300 ते 500 रुपये मिळतात. एका रात्रीत त्या 1500 ते 2000 रुपये कमावतात. कटिहारच्या सालमारी आणि बारसोई परिसरात राहणाऱ्या या महिला अशाप्रकारचा वेश्या व्यवसाय करतात, असंही तपासात उघडकीस आलं आहे. दरम्यान, सदर रुग्णालयाचा सिक्योरिटी इन्चार्जकडून नगर ठाणे पोलिसांकडे या महिलांना ताब्यात देण्यात आलं आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या देहव्यापाराच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे, पोलीस याचाही तपास करत आहेत.
हे ही वाचा >> आनंदाची बातमी! फक्त 3000 रुपयात वर्षभराचा Toll पास, नितीन गडकरींची मोठी घोषणा
त्या ठिकाणीही सुरु होता वेश्या व्यवसाय, पण नंतर..
पुण्यातील बुधवार पेठेत वेश्यव्यवसायाच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी सुरु असल्याचं समोर आलं होतं. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या रॅकेटचा पर्दाफाश केला असून धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे. आक्का या नावाने ओळखल्या जाणारी एक महिला सेक्स वर्कर ग्राहकांना मेफेड्रोन पुरवत असल्याचे आढळून आलं. याप्रकरणी त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव ज्योती सुनील यादव उर्फ कट्टीमणी (वय 50) असून ती महिला कात्रजची रहिवासी आहे.