कोकणात पाऊस घालणार धिंगाणा; तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी, आजचं हवामान वाचाच

मुंबई तक

Maharashtra Weather Update : राज्यातील मान्सून परिस्थितीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 18 जून रोजी कोकणातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय असणार आहे. तर विदर्भातील काही ठिकाणी मध्यम पावसाचे प्रमाण असणार आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील मान्सून परिस्थितीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला

point

18 जून रोजी कोकणातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय राहणार

Maharashtra Weather Update : राज्यातील मान्सून परिस्थितीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 18 जून रोजी कोकणातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय असणार आहे. तर विदर्भातील काही ठिकाणी मध्यम पावसाचे प्रमाण असणार आहे. पर्जन्यमानाचा विचार केला तर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. 

हेही वाचा : महिला हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आलेली रंगात, पतीची अचानक एंट्री.. थेट छातावरून मारली उडी

कोकणभागातील हवामानाचा अंदाज

कोकण विभागाचा विचार केल्यास हवामान खात्याने मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण विभागाला हवामान खात्याने हवामानाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर पूरजन्य परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली आहे. समुद्रात भरती येण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.  

मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस

मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. तसेच हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

मराठवाड्यातील मान्सूनस्थिती

मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. तसेच वातावरण 30-34 अंश सेल्सिअस तापमाण राहणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतीसाठी हवामानचा अंदाज एकदा तापासावा. 

अमरावतीत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि अमरावतीत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. तसेच वातावरण हे उष्ण किंवा दमट असणार आहे. यामुळे अष्माघातापासून बचावासाठी पाणी आणि पातळ कपडे वापरावे. 

हेही वाचा : Pune : महिला रिलस्टारने आधी प्रियकराचे हात-पाय बांधले, नंतर केलं विचित्र कृत्य...

शेतकऱ्यांना सल्ला

याचपार्श्वभूमीवर  हवामान विभागाने शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त असल्याने पेरणीची घाई टाळण्याचं आवाहन केलं आहे. तसेच अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान होणार असून नुकसान टाळण्यासाठी पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या. 

हे वाचलं का?

    follow whatsapp