RRB Recruitment: रेल्वेत 6000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती; कधी कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती..
रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून जगभरातील तरुणांसाठी टेक्नीशियन ग्रेड-1 आणि ग्रेड-III च्या एकूण 6180 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रेल्वेत सरकारी नोकरीची संधी
RRB कडून 6000 पदांसाठी बंपर भरती
अर्ज करण्याची तारीख काय?
Govt Job: अनेक तरुण रेल्वे बोर्डात सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. अशा तरुणांसाठी रेल्वे बोर्डातून चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून जगभरातील तरुणांसाठी टेक्नीशियन ग्रेड-1 आणि ग्रेड-III च्या एकूण 6180 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत टेक्निकल म्हणजेच तांत्रिक क्षेत्रात तरुणांना रेल्वे सेवेत काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 28 जून 2025 पासून सुरु होणार असून 28 जुलै 2025 पर्यंत उमेदवार अर्ज करु शकतात. rrbapply.gov.in या रेल्वे बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार अर्ज करु शकतात. भरतीसाठी अर्जाची लिंक अॅक्टिव्ह होताच उमेदवार त्वरीत वेबसाइटवर जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करु शकतात.
या भरतीमध्ये टेक्नीशियन ग्रेड-1 ची 80 पदे आणि टेक्नीशियन ग्रेड-III साठी 6000 पदांचा समावेश आहे. या पदांच्या रिक्त जागा वेगवेगळ्या झोनमध्ये भरल्या जातील. उमेदवार वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशनमध्ये याची सविस्तर माहिती तपासू शकतात.
वयोमर्यादा
रेल्वेमधील या दोन्ही विभागातील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे वय असणं अनिवार्य आहे. तसेच सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील (SC, ST, OBC, PwD) उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.










