मुंबईत तुफान पावसाला सुरुवात, पुढचे 3-4 तास धोक्याचे.. हवामान खात्याकडून Alert जारी
Mumbai Heavy Rain: मुंबईत आज (18 जून) मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आधी हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र दुपारी 5 वाजेनंतर हवामान खात्याकडून मुंबईसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये पुढील 3-4 तास तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई क्षेत्रीय हवामान केंद्राने आज (18 जून) दुपारी एक महत्त्वाची अपडेट देत पावसाचा इशारा दिला आहे. नव्या अपडेटनुसार मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे आणि नाशिकच्या घाट क्षेत्रात पुढील 3-4 तासांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. IMD च्या नवीन रडार फोटोच्या आधारे हा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
IMD च्या रडार फोटोमध्ये दिसून येणाऱ्या नकाशात मुंबई आणि त्याच्याभोवतीच्या परिसरात जोरदार पावसाचे ढग दाटलेले आहेत. नकाशात निळ्या रंगाने दर्शवलेले ढग हे पावसाच्या तीव्रतेचे संकेत देतात, तर पिवळ्या आणि हिरव्या रंगाने मध्यम ते हलक्या पावसाचे क्षेत्र दर्शवले आहे. मुंबई केंद्रस्थानी असलेल्या 50 किमी व्यासाच्या रडार क्षेत्रात पावसाचे प्रमाण सर्वाधिक दिसून येते. नाशिक आणि पुणे परिसरातही पावसाचे चिन्ह दिसत असून, घाट क्षेत्रात ढगांचा घनता जास्त आहे.
हे ही वाचा>> मुंबईची खबर: मुंबईकरांनो तुमची BMC पुराच्या संकटासाठी खरंच आहे सज्ज?
मुंबईत तुफान पावसाला सुरुवात
सध्या मुंबई आणि ठाण्यात तुफान पावसाला सुरुवात झाली असून रायगड, पालघर आणि पुणे व नाशिकच्या घाट क्षेत्रातील काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.
हे ही वाचा>> गोदावरीत अंघोळीला उतरले, एकाच कुटुंबातले 5 तरूण बुडाले, बाजूलाच बोट असूनही...
पावसाची तीव्रता: मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता, ज्यामुळे स्थानिक पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.










