गोदावरीत अंघोळीला उतरले, एकाच कुटुंबातले 5 तरूण बुडाले, बाजूलाच बोट असूनही...

मुंबई तक

एकाच कुटुंबातील पाच तरुणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. दुपारी1 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं परिसरात काही वेळ मोठा गोंधळ उडाला होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हैदराबादमधून आलेल्या कुटुंबातले 5 तरूण दगावले

point

गोदावरी नदीत अंघोळीसाठी उतरले होते तरूण

नांदेड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून, अनेक नद्या ओसंडून वाहतयात. मात्र, यादरम्यानच अनेक दुर्घटना घडत आहेत. काल दुपारी एकीकडे पुण्याच्या मावळमध्ये घडलेल्या घटनेनं राज्याला हादरवलं. तशीच घटना दुसरीकडे नांदेडजवळ घडली. तेलंगणा राज्याच्या सीमेच्या आत असणाऱ्या प्रसिद्ध बासर येथील सरस्वती देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. 

हे ही वाचा >>माथेरानच्या शॉर्लेट तलावात नवी मुंबईतील 3 जण बुडाले! 'ती' एकच चूक नडली..

बुडालेले सगळे एकाच कुटुंबातले...

हैदराबादमधील एकाच कुटुंबातील पाच तरुणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. दुपारी1 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य हाती घेतलं. मृत्यू पावलेले सर्व तरुण 17 ते 18 वर्षे वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे.

हैदराबाद येथील दिलसुख नगर परिसरातील चिंतल बाजार येथे राहणारे एकाच कुटुंबातील 18 जण सरस्वती मातेच्या दर्शनासाठी बासर येथे आले होते. मंदिरात दर्शनापूर्वी पवित्र स्नान करण्यासाठी हे कुटुंब गोदावरी नदीतील एका बेटावर गेलं. 

बोट मधोमध गेल्यावर अंघोळीला उतरले

स्थानिक बोटचालकाच्या बोटीने नदीपात्रात प्रवेश केल्यानंतर काही तरुणांनी अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने पाच तरुण खोल पाण्यात अडकले आणि बुडाले. मृतांमध्ये राकेश, विनोद, मदन, रुतिक आणि भरत यांचा समावेश आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp