सोनमचं आधी 'या' बिझनेसमनच्या मुलाशी ठरलेलं लग्न, पण ज्योतिषीने 'ती' गोष्ट सांगितली अन्...

मुंबई तक

एका व्यावसायिकाने या सोनम आणि राजा रघुवंशीच्या प्रकरणाबद्दल एक नवा खुलासा केला आहे. त्यांच्या मते, राजा रघुवंशी आणि सोनमचं लग्न ठरण्याआधी तिचं लग्न त्या व्यवसायिकाच्या मुलासोबत होण्याच्या चर्चा होत होत्या. लग्न ठरवताना ज्योतिषाने काय सांगितलं? पाहा...

ADVERTISEMENT

सोनमचं आधी 'या' बिझनेसमनच्या मुलाशी ठरलेलं लग्न
सोनमचं आधी 'या' बिझनेसमनच्या मुलाशी ठरलेलं लग्न
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राजा रघुवंशी हत्येप्रकरणातील नवा खुलासा

point

व्यावसायिकाचा सोनमचं लग्न त्याच्या मुलाशी ठरल्याचा दावा

point

दोघांच्या कुंडलीत मिळालेले 25 गुण, पण...

Raja and Sonam Raghuvanshi Case: इंदौरमधील सोनम रघुवंशी केसबद्दल लोकांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतंय. सोनमने हनिमूनच्या दिवशी आपल्या प्रियकर आणि मित्रांसोबत पूर्ण नियोजिन पद्धतीने पतीचा खून केल्याचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर सोनम आणि तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल बऱ्याच धक्कादायक बाबी देखील समोर येत आहेत. 

राजाच्या आधी 'या' मुलासोबत ठरलेलं सोनमचं लग्न

धार शहरातील एका व्यावसायिकाने या प्रकरणाबद्दल एक नवा खुलासा केला आहे. त्यांच्या मते, राजा रघुवंशी आणि सोनमचं लग्न ठरण्याआधी तिचं लग्न त्या व्यवसायिकाच्या मुलासोबत होण्याच्या चर्चा होत होत्या. त्यावेळी जवळपास सर्व काही ठरलं होतं. अगदी कुंडलीसुद्धा जुळल्या होत्या, मात्र त्यावेळी ज्योतिषाने असं काही सांगितली की त्यामुळे सोनमच्या कुटुंबियांनी हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. 

धार शहरातील एका व्यावसायिकाने याबद्दल सांगितले की 2024 मध्ये त्याचा मुलगा मयंकचं लग्न सोनमशी ठरणार होतं. व्यावसायिकाच्या मते, त्याचा मुलगा मयंक आणि सोनम यांचे सुमारे 25 गुण जुळत होते. परंतु कुंडली जुळल्यानंतर, ज्योतिषाने त्याला या नात्याबद्दल वेगळाच इशारा देत 'हे नाते तुमच्या कुटुंबासाठी योग्य राहणार नाही', अशी भविष्यवाणी केली. यानंतर, मयंक आणि सोनमच्या लग्नाची चर्चा तिथेच थांबली.

हे ही वाचा:  'हे आजच ठेचायला पाहिजे...' हिंदी सक्तीवरून राज ठाकरे संतापले, 'ते' पत्र आलं समोर!

पोलिसांनी केलेल्या तपासातील खुलासे

मंगळवारी, शिलाँग पोलिसांनी राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा तपास पुढे नेत, ते इंदौरमधील राजाच्या घरी पोहोचले आणि कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. पोलिस पथकाने राजाच्या आई आणि दोन्ही भावांशी सुमारे एक तास चर्चा केली. या काळात, हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिच्या वागण्याबद्दल आणि घटनांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. शिलाँग पोलिसांनी घटनेपूर्वी सोनमचे वर्तन, तिच्या कुटुंबाशी असलेले तिचे संबंध आणि तिच्या हनिमून ट्रिपशी संबंधित बाबींवर लक्ष केंद्रित केलं. या प्रकरणात अधिक पुरावे गोळा करण्याच्या दिशेने पोलिसांचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp