'हे आजच ठेचायला पाहिजे...' हिंदी सक्तीवरून राज ठाकरे संतापले, 'ते' पत्र आलं समोर!
शैक्षणिक अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची करण्याचं सरकारचं धोरण असल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. तसंच त्यांनी या सगळ्याला शाळांनी देखील विरोध करावा अशी मागणी केली आहे. त्यासाठी एक पत्र देखील त्यांनी लिहिले आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा असेल अशा स्वरुपाचं परिपत्रक महाराष्ट्र सरकारकडून जारी करण्यात आलं. ज्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबाबत सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'हिंदीची सक्ती केली तर महाराष्ट्रात मराठी भाषा ही संपूनच जाईल.' असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी स्पष्टपणे म्हटलं की, 'उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार. एकदा ते घुसलं की, नंतर ते नाही काढता येणार तुम्हाला. हे आजच ठेचायला पाहिजे.'
हे ही वाचा>> "हिंदी लादणार असाल, तर संघर्ष अटळ...", राज ठाकरे आक्रमक, तिसऱ्या पत्रात थेट इशारा
दरम्यान, याचवेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना एक खुलं पत्रच लिहिलं आहे. ज्यामध्ये राज ठाकरेंनी म्हटलंय की, 'शाळेत मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जो हाणून पाडला पाहिजे.' या सगळ्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी एक सविस्तर पत्र लिहलं आहे. त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण जाणून घेऊया.
हे ही वाचा>> मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात, 'हिंदी आमची लाडकी...'
राज ठाकरेंचं 'ते' पत्र जसंच्या तसं...
महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना..