"हिंदी लादणार असाल, तर संघर्ष अटळ...", राज ठाकरे आक्रमक, तिसऱ्या पत्रात थेट इशारा

मुंबई तक

राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील मराठी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं. पाच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी हे पत्र लिहिलं, ते त्यांनी आज जाहीर केलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरे यांचा सरकारला इशारा

point

"आव्हान वाटत असेल, तर आव्हान म्हणून घ्या..."

point

"कोणत्या शाळेत हिंदू शिकवतात ते आम्ही पाहू"

Raj Thackeray on Marathi : मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. हिंदी लादणार असाल, तर संघर्ष अटळ आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला पाठवलेले जुनं पत्रही वाचून दाखवलं. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला. पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा शिकवणार आणि तिसरी भाषा हिंदी असणार हे अनिवार्य केल्याचा निर्णय झाल्यानंतर राज्यात गोंधळ सुरू झालाय. त्यावर राज ठाकरेंनी सरकारला सवाल करत कोणत्या शाळा हिंदी भाषा शिकवतात हे आम्ही पाहू असं राज ठाकरे म्हणाले. 

हे ही वाचा >> पत्नीला कोयत्यानं मारून संपवलं, मध्ये येणाऱ्या चिमुकल्यांवरही वार... पंढरपुरात पती का झाला राक्षस?

मुख्याध्यापकांना राज ठाकरेंचं आवाहन...

राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील मराठी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं. पाच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी हे पत्र लिहिलं. मराठी, इंग्रजी, हिंदी या तीन भाषा शिकवण्याला मनसेने विरोध केला. मात्र, सरकारने पळवाट काढत ऐच्छिक भाषेचा पर्याय दिला. 

हे ही वाचा >> 'राजा'सारखंच वीरूला संपवलं... लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच उशीने तोंड दाबून...

तिसरी भाषा शिकायची नाही, तर मग पुस्तक छपाई का सुरू आहे असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. तसंच हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, त्यामुळे मुख्याध्यापकांनी याला बळी पडू नये असं आवाहन राज ठाकरे यांनी केला आहे. तीन भाषांची गरज काय? उत्तरेतल्या लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचाय, त्यामुळे हिंदी माथी मारली जातेय, याला तुम्ही बळी पडू नका असं राज ठाकरे म्हणाले. 

तर तो महाराष्ट्रद्रोह मानला जाईल...

राज ठाकरे म्हणाले, मी या मुद्द्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलत होतो. त्यांनी आश्वासन दिले आहे की ते पूर्वीचा निर्णय मागे घेतील. हिंदी लादण्याच्या निर्णयावर सरकारने पळून जाण्याचा मार्ग निवडला आहे. आता ते म्हणतात की ती ऐच्छिक तिसरी भाषा असेल. आम्ही निषेध केला आहे आणि करत राहू. जर विद्यार्थी या निर्णयासाठी तयार नसतील तर सरकार हिंदी पुस्तकं का छापत आहे. सरकारच्या दबावाला बळी पडू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत असं राज ठाकरेंनी मुख्याध्यापकांना आवाहन केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp