Pathaan : प्रचंड विरोधानंतरही ‘पठाण’ने पहिल्या दिवशी केली विक्रमी कमाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pathaan Movie Box Office Colection : मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानचा (Superstar Shahrukh khan) चित्रपट पठाण (Pathaan) 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने (Box Office) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. शाहरुख खानचा ‘पठाण’ पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई करू शकतो, असे ट्रेड पंडितांचे मत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. (What Is The first Day Collection of Pathaan Movie)

ADVERTISEMENT

Pathan : “…नाहीतर आम्ही ‘बांबू’ लावू”, मनसेचा थिअटर्स मालकांना इशारा

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सांगितले की, ‘पठाण’ ने नॅशनल चेन्स थिएटरमध्ये रात्री 8.15 वाजेपर्यंत 25 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अशा प्रकारे पठाण या चित्रपटाने ‘वॉर’, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ आणि ‘केजीएफ’चे ओपनिंग डे कलेक्शन रेकॉर्ड मोडले आहेत.

हे वाचलं का?

‘पठाण’ने केली इतके कोटींची कमाई

तरण आदर्शने ट्विट केले की शाहरुख खानच्या ‘पठाण’ने PVR कडून 11.40 कोटी रुपये, INOX 8.75 कोटी, Cinepolis 4.90 कोटी रुपये कमावले आहेत. अशाप्रकारे ‘पठाण’ने आतापर्यंत या राष्ट्रीय थिएटर चेनमधून 25.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनचे हे आकडे रात्री 8.15 वाजेपर्यंतचे आहेत.

ADVERTISEMENT

Pathaan चित्रपट रिलीज; चाहत्यांचा जल्लोष तर काही ठिकाणी हातात लाठ्या…

ADVERTISEMENT

शाहरुखने या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले

ट्रेड अॅनालिस्टने असेही सांगितले की, ‘वॉर’ने पहिल्या दिवशी 19.67 कोटी रुपये, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने 18 कोटी आणि ‘केजीएफ’ने 22.15 कोटी रुपये कमवले. अशा प्रकारे पाहिल्यास ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे.

शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांसारख्या स्टार्सनी ‘पठाण’मध्ये काम केलं आहे. शाहरुख खानची रॉ एजंटची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते. त्याचबरोबर या सिनेमात जॉन अब्राहमने खलनायकाची भूमिका साकारली आहे.

शाहरुख खानचे आगामी सिनेमा

विशेष म्हणजे ‘पठाण’ नंतर शाहरुख खान ‘डंकी’ आणि ‘जवान’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे. गेल्या वर्षी राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान यांनी एक व्हिडिओ जारी करताना ‘डंकी’ची घोषणा केली होती. त्याचबरोबर ‘जवान’मधून शाहरुखचा लूक समोर आला आहे. ‘पठाण’ प्रमाणेच हा देखील एक अॅक्शन चित्रपट असेल, ज्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली करत आहेत. या चित्रपटात विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT