रस्त्यावर थुंकणाऱ्यांना फक्त 200 रुपयांचा दंड का? हायकोर्टाचा महापालिकेला प्रश्न
रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून फक्त 200 रुपयांचाच दंड का वसूल का करता? आज घडीला 200 रुपयांची काय किंमत आहे? रस्त्यावर थुंकणाऱ्यांसाठी 1200 रुपये दंड घेण्याची तरतूद आहे तरीही तुम्ही 200 रुपये दंड का घेता? असा प्रश्न बॉम्बे हायकोर्टाने मुंबई महापालिकेला विचारला आहे. सरन्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांनी हा प्रश्न विचारला आहे. बॉम्ब पोलीस अॅक्ट […]
ADVERTISEMENT
रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून फक्त 200 रुपयांचाच दंड का वसूल का करता? आज घडीला 200 रुपयांची काय किंमत आहे? रस्त्यावर थुंकणाऱ्यांसाठी 1200 रुपये दंड घेण्याची तरतूद आहे तरीही तुम्ही 200 रुपये दंड का घेता? असा प्रश्न बॉम्बे हायकोर्टाने मुंबई महापालिकेला विचारला आहे. सरन्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांनी हा प्रश्न विचारला आहे. बॉम्ब पोलीस अॅक्ट अन्वये रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून 1200 रुपयांचा दंड घेण्याची तरतूद आहे असंही त्यांनी सांगितलं. एवढंच नाही तर लोक याबाबत संवेदनशील नाहीत ते कसे होतील ? त्यासाठी मोहीम राबवण्याची गरज आहे असंही कोर्टाने महापालिकेला सांगितलं.
ADVERTISEMENT
पत्नीचं तंबाखूचं व्यसन हे घटस्फोटाचं कारण असू शकत नाही-कोर्ट
एका जनहित याचिकेवर सुनावणी करत असताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. अरमिन वांद्रेवाला यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. त्यांनी कोर्टाला हेदेखील सांगितलं की राज्यात अनेक ठिकाणं अशी आहेत जी सार्वजनिक असूनही तिथे लोक खुशाल थुंकतात. एवढंच नाही तर थुंकणाऱ्या लोकांवर महापालिका किंवा पोलीस यांच्याकडून काहीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण वाढलं आहे. रस्त्यावर थुंकणं हा प्रकार साथ रोग पसरवण्यासाठी घातक ठरू शकतो त्यामुळे लोकांच्या या चुकीच्या सवयीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यावर कोर्टाने आपलं निरीक्षण नोंदवून फक्त 200 रुपये दंड का घेता 1200 रूपये दंड का घेत नाही असा प्रश्न महापालिकेला विचारला आहे.
हे वाचलं का?
कोर्ट म्हणतं…वस्त्र असलेल्या छातीला स्पर्श लैंगिक अत्याचार नाही!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT