WhatsApp ने एका महिन्यात भारतातील 20 लाखाहून अधिक अकाउंट केले बंद, काय आहे नेमकं कारण?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp कडून गुरुवारी एक अत्यंत मोठी माहिती जाहीर करण्यात आलआहे. गेल्या महिन्यात तब्बल 20 लाखाहून अधिक भारतीयांचे व्हॉट्सअॅप अकाउंट बंद करण्यात आले आहेत. WhatsApp आपल्या मासिक अहवालात याबाबतची माहिती दिली आहे. हा अहवाल नवे आयटी नियम (New IT Rules)लागू झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. कारण नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना दरमहा […]
ADVERTISEMENT
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp कडून गुरुवारी एक अत्यंत मोठी माहिती जाहीर करण्यात आलआहे. गेल्या महिन्यात तब्बल 20 लाखाहून अधिक भारतीयांचे व्हॉट्सअॅप अकाउंट बंद करण्यात आले आहेत. WhatsApp आपल्या मासिक अहवालात याबाबतची माहिती दिली आहे. हा अहवाल नवे आयटी नियम (New IT Rules)लागू झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. कारण नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना दरमहा अनुपालन अहवाल (Compliance Report) द्यावा लागणार आहे.
ADVERTISEMENT
WhatsApp ने गुरुवारी जारी केलेल्या अहवालात असं म्हटलं आहे की, 15 मे ते 15 जून दरम्यानचा हा डेटा आहे. व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत 20 लाख 11 हजार खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही खाती बंद करण्यात आली आहे.
WhatsApp कडून अकाउंट कधी Ban केलं जातं?
हे वाचलं का?
कंपनीच्या मते, जेव्हा कोणतेही बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणे, धमकावणे, त्रास देणे आणि द्वेषयुक्त भाषण किंवा वांशिक किंवा वांशिक भेदभाव करणे किंवा अन्यथा कोणत्याही बेकायदेशीर किंवा अन्यायकारक अशा स्वरुपाचा कंटेंट शेअर करतं तेव्हा अशाप्रकारचे अकाउंट बंद केले जातात. या व्यतिरिक्त जर एखादा यूजर व्हॉटसअॅपच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करत असेल तर त्याचेही अकाउंट बंद केले जाते.
काय आहेत नवे IT नियम?
ADVERTISEMENT
नवीन IT नियम ज्यांना मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल नीतिशास्त्र कोड नियम 2021 (Intermediary Guidelines and Digital Ethics Code Rules 2021) म्हणून देखील ओळखले जाते. त्याच्या नियम 4 (डी) मध्ये असे म्हटले आहे की, सोशल मीडिया कंपन्यांना मासिक आधारावर अनुपालन अहवाल (Compliance Report) द्यावा लागेल. यामध्ये कंपन्यांना त्यांच्याकडून किती तक्रारी आल्या आणि त्यांनी यावर काय कारवाई केली हे देखील सांगावे लागेल.
ADVERTISEMENT
कंपनीने असे स्पष्टीकरण दिले आहे की 95% पेक्षा जास्त निर्बंध हे स्वयंचलित किंवा बल्क मेसेजिंग (स्पॅम) च्या अनधिकृत वापरामुळे आहेत. फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp कंपनीने म्हटले आहे की, 2019 पासून असे अकाउंट ब्लॉक करण्याची संख्या वाढली आहे. कारण त्यांची व्यवस्था अधिक प्रगत झाली आहे आणि असे अकाउंट शोधण्यात मदत होत आहे.
मोदी सरकारचा Twitter ला निर्वाणीचा इशारा, नियम पाळा नाहीतर…
सरासरी, व्हॉट्सअॅप दरमहा जगभरात सुमारे 80 लाख अकाउंट बॅन आणत आहे किंवा त्यांना निष्क्रिय करत आहे. गुगल, कु, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील त्यांचे अनुपालन अहवाल सादर केले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT