भिरकावलेला तो दगड, कार्यक्रम न करण्याची शपथ ते नागरी सत्कार, नागपूरशी लतादीदींचं होतं खास नातं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

ADVERTISEMENT

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सर्व देशभर दुःखाचं वातावरण आहे. शिवाजी पार्कवर आज लता मंगेशकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यात लतादीदींनी आपल्या सुरावटींनी जादू तयार निर्माण केली. परंतू लतादीदींच्या आयुष्यात काही प्रसंग असेही घडले की ज्याचा त्यांना फारच त्रास झाला. नागपूर शहराबद्दल लतादीदींची एक अशीच आठवण आहे.

काय होता तो प्रसंग?

हे वाचलं का?

१९५० साली पटवर्धन ग्राऊंडमध्ये लतादीदींच्या गाण्यांचा एक कार्यक्रम ठेवला होता. यावेळी लतादीदींनी उन्हाचा त्रास झाल्यामुळे त्यांनी कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या एका चाहत्याने त्यांच्या दिशेने एक दगड भिरकावला होता. सुदैवाने तो दगड कोणालाही लागला नाही. परंतू यानंतर नाराज झालेल्या लतादीदींनी नागपुरात एकही कार्यक्रम करणार नाही अशी शपथच घेतली होती.

Lata Mangeshkar: लतादीदींनी गायनाची सुरवात केलेली ‘या’ शहरातून

ADVERTISEMENT

या घटनेनंतर लतादीदींनी नागपुरात कार्यक्रम करावा यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले, परंतू हा योगायोग काहीकेल्या जुळून येत नव्हता.

ADVERTISEMENT

मी फक्त लता मंगेशकरांना ओळखतो…जेव्हा सुनील गावसकर पाकिस्तानात जाऊन अपमानाचा बदला घेतात

१९९५ साली लतादीदींचे भाऊ आणि प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर हे नागपूर महापालिकेच्या एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे आले होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा नागपूर महानगरपालिकेद्वारे नागरी सत्कार व्हावा यासाठी तत्कालीन माजी महापौर अटलबहादूर सिंग यांच्या विशेष पुढाकार घेतला होता. यावेळी नागपुरातील काही मंडळींनी हृदयनाथ यांच्याकडे दीदींची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करा अशी विनंती केली. यानंतर हृदयनाथ यांनी लतादीदींची मनधरणी केल्यानंतर त्या नागपूरमध्ये येण्यासाठी तयार झाल्या.

१९ नोव्हेंबर १९९६ रोजी लता मंगेशकर यांचा नागपूर महापालिकेतर्फे नागरी सत्कार सोहळा करण्यात आला. त्यावेळी सत्कार कार्यक्रमाला तत्कालीन महापौर कुंदाताई विजयकर, उपमहापौर निखारे, विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दत्ता मेघे, गुलाबराव गावंडे, माजी महापौर अटलबहादूर सिंग उपस्थित होते. सिव्हिल लाईन्स येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये हा नागरी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये प्रेक्षकांची उपस्थिती ही लक्षणीय होती. नागरी सत्कार कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांकडून लतादीदींना गीत गाण्यासाठी आग्रह करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी लतादीदींनी पसायदान गायले होते. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर सुद्धा उपस्थित होते.

‘आकाशात सूर्य आहे चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे,’ असं का म्हणाले होते पु.ल. देशपांडे? वाचा…

या सत्कार सोहळ्यात बोलत असताना लतादीदींनी नागपूरकरांशी संवाद साधत, काही वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगाबद्दल भाष्य करत, तुम्ही मला बोलवा मी लगेच येते की नाही ते पाहा असं म्हणत सर्वांची मनं जिंकली होती. काय म्हणाल्या होत्या, लतादीदी त्या सोहळ्यात, याचा हा संपादीत भाग थोडक्यात….

अक्कलकोटच्या अन्नछत्र मंडळाशी लतादीदींचं होतं खास नातं, स्वतः पोळ्या लाटून केली होती सेवा

‘विदर्भात माणसाचा सच्चेपणा आणि मोठेपणा दिसतो. नागपूरला मी भारतीय पुरातन संस्कृतीची प्राचीन राजधानी मानते. नागपुरात एखादा कार्यक्रम उधळला म्हणून मी नागपूरला येणारच नाही, इतकी मी वेडी, नादान वा खाष्ट नाही आणि भित्री तर नाहीच नाही. नागपूरकरांवर मी रागावले म्हणून मी इथे येत नाही हा आरोप अगदी मिथ्या आहे. आज मनमोकळेपणाने संवाद होतोय. आता कार्यक्रम सादर करण्याची संधीही नागपूरकर लवकर आणतील अशी आशा करते. तुम्ही बोलवा, मी लगेच येते की नाही ते पहा’, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे हे शब्द नागपूर आणि विदर्भावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी पुरेसे ठरले.

अर्ध्यावरती डाव मोडला…’या’ कारणामुळे लतादीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहीत

महाभारतात महाराष्ट्राचा उल्लेख कुठेही येत नाही पण विदर्भाचा वारंवार येतो. म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्र हे नावही अस्तित्वात नव्हते त्यावेळी विदर्भ हे वैभवशाली राज्य होते. माझ्या या विधानावर राजकारणी, विद्वान, संशोधक, समीक्षक यांच्यामध्ये वादावादी होणार. पण या साऱ्यांना एक कलाकार वितंडवादापेक्षा आणि कुठला आनंद देणार? असो, म्हणून मी नागपूरला पुरातन संस्कृतीची प्राचीन राजधानी मानते. ही भारतीय पुरातन संस्कृती, त्या संस्कृतीची जीवनमूल्ये विदर्भाने अजून जपून ठेवली आहेत, याचा मला अभिमान आहे. जुन्या वास्तूत किंवा प्राचीन मंदिरात प्रवेश करताना जो भाव मनात रुंजी घालतो पण नंतर तो व्यक्त करता येत नाही. ते अव्यक्त भावविश्व आज माझ्या मनात कोंदाटले आहे.

प्राचीन संस्कृतीचे, जीवनमूल्यांचे, विद्वतेचे, शौर्याचे, साधेपणाचे, निष्कपट हृदयाचे व उदार मनाचे उत्कट दान विदर्भाला ईश्वराने दोन हातांनी दिले आहे. या अगत्याचा मी कालपासून अनुभव घेत आहे. उजव्या हाताचे दान डाव्या हाताला कळू द्यायचे नाही, हा मनाचा सच्चेपणा व मोठेपणा फक्त विदर्भातच दिसतो. जे मनापासून आवडले ते निर्भयपणे डोक्यावर घेणे व जे आवडले नाही ते तितक्याच निर्भयतेने फेकून देणे, ही विदर्भाला मिळालेली आणखीन एक देणगी, असेही त्या म्हणाल्या होत्या. विदर्भात कलावंतांची होणारी कदर यावर वडिल मा. दीनानाथ मंगेशकर नेहमी ‘लता, कंपनी तोट्यात आली की आम्ही विदर्भाचा दौरा काढतो. ६ महिन्यांत सारे ठिकठाक होते.’ असे सांगत असल्याचीही आठवण त्यांनी सांगितली होती.

’४०-४५ वर्षांपूर्वी माझ्या कार्यक्रमात काही गैरसमजुतींमुळे गोंधळ झाला. तो राग मनात धरून मी नागपुरात येत नाही, असा काही लोकांचा गैरमज आहे. तक्रार आहे. टीकाही आहे. राग, तक्रार आणि टीका हेही विदर्भाला मिळालेले खास दान आहे. गेली ५० वर्षे मी माझ्या कामात इतकी व्यस्त आहे की, हिंदुस्थानातील मोठमोठ्या शहरी मी एक सुद्धा कार्यक्रम अजून केला नाही. त्या गोंधळात झालेल्या कार्यक्रमानंतर नागपुरात मला कोणी बोलाविले नाही आणि काळाच्या ओघात ४० वर्षे सहज विरून गेली. नागपूरकरांवर मी रागावले म्हणून मी येथे येत नाही हा आरोप अगदी मिथ्या आहे. कारण ज्या सांगली शहरात माझ्या वडिलांच्या घरादाराचा लिलाव झाला, बेअब्रू झाली त्याच सांगली शहरात मी हॉस्पिटलच्या मदतीसाठी कार्यक्रमही केला आणि अनेक वेळा मी तिथे जाते. त्या शहरावर मी कधी राग धरला नाही. ज्या शहरात माझ्या वडिलांचा विपन्नावस्थेत मृत्यू झाला त्या पुणे शहराचाही मी द्वेष करीत नाही. उलट ‘दीनानाथ प्रतिष्ठान’ स्थापून त्या प्रतिष्ठानाद्वारे अनेक कार्यक्रम आम्ही पुणे येथे केले. ज्या शहरात आपण वाईट दिवस पाहिले, आपल्याला वाईट अनुभव आले, ते शहर वाईट किंवा दुष्ट असे मानण्याइतकी मी मूर्ख नाही आणि दीर्घद्वेषीही नाही. शहरं तीच असतात, माणसंही तीच असतात. कोणीही वाईट वा दुष्ट नसतं. वाईट असते ती आपली वेळ, वाईट असते ती नियतीची खेळी. एक गाणं खराब झालं म्हणून कोणी गाणं सोडून देत नाही. नागपुरात एक कार्यक्रम उधळला म्हणून नागपूरकरांचे तोंड पाहायचे नाही, इतकी मी वेडी, नादान वा खाष्ट नाही आणि भित्री तर नाहीच नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी जुन्या सर्व गैरसमजांना फेटाळून लावले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT