Parag Agarwal : IIT Bombay चे विद्यार्थी ते Twitter CEO; कोण आहेत पराग अग्रवाल ?
जगभरात लोकप्रिय असलेल्या मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरच्या सीईओपदाची जबाबदारी एका भारतीय व्यक्तीवर सोपवण्यात आली. पराग अग्रवाल, असं ट्विटरच्या नव्या सीईओंचं नाव आहे. जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर अग्रवाल यांच्याकडे सीईओ पदाची सूत्रं देण्यात आली आहेत. आयआयटी बॉम्बेतून शिक्षण घेतलेल्या पराग अग्रवाल यांची या नियुक्तीनंतर सगळीकडेच चर्चा सुरू आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल… जॅक डॉर्सी यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरच्या […]
ADVERTISEMENT
जगभरात लोकप्रिय असलेल्या मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरच्या सीईओपदाची जबाबदारी एका भारतीय व्यक्तीवर सोपवण्यात आली. पराग अग्रवाल, असं ट्विटरच्या नव्या सीईओंचं नाव आहे. जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर अग्रवाल यांच्याकडे सीईओ पदाची सूत्रं देण्यात आली आहेत. आयआयटी बॉम्बेतून शिक्षण घेतलेल्या पराग अग्रवाल यांची या नियुक्तीनंतर सगळीकडेच चर्चा सुरू आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…
ADVERTISEMENT
जॅक डॉर्सी यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरच्या संचालक मंडळाने सर्वसंमतीने ट्विटरचे मुख्य टेक्निकल अधिकारी असलेल्या पराग अग्रवाल यांची सीईओपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.
शिक्षण आणि करिअर…
हे वाचलं का?
पराग अग्रवाल यांचा जन्म भारतात झाला आणि ते भारतातच मोठे झाले. आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदवीचं (Graduation) शिक्षण घेतलं आहे.
त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून ‘कम्प्युटर सायन्स’ (computer science) पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ऑक्टोबर 2011 मध्ये इंजिनिअर म्हणून ट्विटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना ट्विटरचे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून बढती देण्यात आली. 2017 मध्ये ट्विटरने पराग अग्रवाल यांना मुख्य टेक्निकल अधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं.
ADVERTISEMENT
ट्विटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असताना पराग अग्रवाल यांनी सुरूवातीला ट्विटरचे यूजर्स, महसूल व मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टेक्निकल स्ट्रेटजी व सुपरव्हिजन विभागांचे मुख्य अधिकारी म्हणून काम केलेलं आहे.
ADVERTISEMENT
ट्विटरमध्ये रुजू होण्यापूर्वी पराग अग्रवाल यांनी AT&T, Microsoft आणि Yahoo या कंपन्यांमध्ये संशोधन इंटर्नशिप केलेली आहे.
विनीता अग्रवाल यांच्यासोबत लग्न…
पराग अग्रवाल यांनी विनीता अग्रवाल यांच्याशी विवाह केला आहे. पराग आणि विनीता यांचा 2015 मध्ये साखरपुडा झाला तर 2016 मध्ये ते विवाहबद्ध झाले. दोघेही कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतात. त्यांना एक मुलगा असून, त्याचं नाव अंश असं आहे.
विनीता अग्रवाल यांच्या ट्विटर प्रोफाईलमधील माहितीनुसार त्यांनी ‘स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसीन’मध्ये फिजिशियन आणि सहाय्यक क्लिनिकल प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT