अँटेलिया प्रकरणाचा तपास करणारे NIA चे विक्रम खलाटे आहेत तरी कोण?
बारामती: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानासमोर संशयित कार सापडली होती. यानंतर महाराष्ट्रासह देशभरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, हा तपास NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेला आणि NIAने याप्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आणि या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं. दरम्यान, या प्रकरणाचा तपास NIA चे अधिकारी […]
ADVERTISEMENT

बारामती: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानासमोर संशयित कार सापडली होती. यानंतर महाराष्ट्रासह देशभरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, हा तपास NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेला आणि NIAने याप्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आणि या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास NIA चे अधिकारी विक्रम खलाटे यांच्यावर सोपवण्यात आला. विक्रम खलाटे हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मूळचे रहिवासी आहेत. जाणून घ्या विक्रम खलाटे नेमके कोण आहेत तरी कोण याविषयी सविस्तरपणे.
विक्रम खलाटे हे मूळचे बारामती तालुक्यातल्या बजरंगवाडी गावचे सुपुत्र आहेत. बारामतीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर विक्रम खलाटे यांचं गाव आहे. त्यांचे चौथीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण हे या शाळेतच झालं. पाचवीनंतर कोऱ्हाळे येथे त्यांनी पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळ येथे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून दिल्ली येथे UPSC शिक्षण पूर्ण केले.
NIA ने घेतला CIUमधील ‘या’ पोलीस अधिकाऱ्यांचा जबाब, वाझेंचं पुढे काय होणार?
2002 साली विक्रम खलाटे यानी आपली अभियांत्रिकीमधली डिग्री पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी upsc करण्याचं ठरवलं आणि पुढील अभ्यासासाठी ते पुणे, मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी गेले. 5 वर्ष अभ्यास केल्यानंतर 2007 मध्ये upsc च्या परीक्षेत ते पास झाले आणि 2008 आणि 2009 च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी बनले.
चोरीला गेलेली स्कॉर्पिओ वाझेंच्या ताब्यात होती? NIA ला संशय
नागालॅंडमध्ये पोलीस अधिक्षक असताना मोकोकचुंग येथे उत्कृष्ट कायदा व सुरक्षा राखल्याबद्दल तेथील राज्यपाल यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर त्यांची पश्चिम बंगालमधील कलकत्त्यामध्ये NIA च्या अधीक्षकपदी नेमणूक झाल्यानंतर वर्धमान जिल्ह्यात बांग्लादेशी 23 अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
यासह अन्य तपासात उत्कृष्ट कामगिरी केल्याने केंद्रीय गृह खात्यातर्फे देण्यात येणाऱ्या युनियन मिनिस्टर या मेडलने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. अंबानींच्या घराबाहेर जी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली त्यात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्याही घटनेचा तपास विक्रम खलाटे हे योग्य पद्धतीने करतील असा विश्वास त्यांच्या गावकऱ्यांना वाटतोय.
वाझेंची अटक आणि POLICE लिहिलेल्या Innova कारचा नेमका संबंध काय?
NIA सारख्या तपास यंत्रणेचा प्रमुख हा आपल्या गावचा असल्याने गावकऱ्यांची मान अभिमानाने उंचावते. सचिन वाझे प्रकरणाचा तपास देखील विक्रम खलाटे हे निःपक्षपातीपणे करतील यावर गावकऱ्यांचा विश्वास आहे.