नवऱ्याच्या लांब दाढीला बायको वैतागली! क्लीन शेव्ह असलेल्या दीरासोबत पळाली अन् नंतर घडलं धक्कादायक...

मुंबई तक

Married Woman Viral Love Story : मेरठमधून एक आगळीवेगळी प्रेमकहाणी समोर आली आहे. नवऱ्याच्या वाढलेल्या दाढीला वैतागून बायकोनं क्लीन शेव्ह असलेल्या दीरासोबत धूम ठोकली.

ADVERTISEMENT

Married Woman Viral Love Story (प्रतिकात्मक फोटो)
Married Woman Viral Love Story (प्रतिकात्मक फोटो)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीला पसंत नव्हती पतीची दाढी 

point

पत्नीने घरी परतल्यावर मागितले अडीच लाख

point

महिलेनं सांगितलं पळून जाण्याचं खरं कारण 

Married Woman Viral Love Story : मेरठमधून एक आगळीवेगळी प्रेमकहाणी समोर आली आहे. नवऱ्याच्या वाढलेल्या दाढीला वैतागून बायकोनं क्लीन शेव्ह असलेल्या दीरासोबत धूम ठोकली. अनेक दिवसानंतर जेव्हा पळून गेलेली महिला घरी परतली, तेव्हा घरात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर या महिलेच्या पतीनं तिला घटस्फोट दिला. आता ती महिला दीरासोबत राहत आहे. पतीच्या दाढीमुळे नाही तर त्याच्या वागणुकीमुळे पळून गेल्याचं त्या महिलेचं म्हणणं आहे.

पत्नीला पसंत नव्हती पतीची दाढी 

लिसाडी गेटच्या उज्ज्वल गार्डनमध्ये राहणाऱ्या शाकिरचं लग्न सात महिन्यांपूर्वी इंचौलीच्या आर्शीसोबत झालं होतं. लग्नानंतर आर्शीने शाकीरवर दाढी कापण्यासाठी दबाव आणला. कारण तिला दाढीवाले पुरुष पसंत नव्हते. या गोष्टीवरून दोघांमध्ये नेहमीच वादविवाद होत होते. आर्शीने हे सुद्धा म्हटलं की, तिचं लग्न जबरदस्तीने करण्यात आलं. जेव्हा शाकिरने दाढी कापण्यास नकार दिला, तेव्हा त्याच्या पत्नीने त्याची तक्रार कुटुंबियांकडे केली. त्यानंतर ती महिला क्लीन शेव्ह ठेवणाऱ्या दीरासोबत पळून गेली. शाकिरने पत्नी गायब झाल्याची तक्रार नोंदवली आहे. 

हे ही वाचा >> आईच्या डोळ्यादेखत 11 महिन्याच्या बाळाला बिबट्याने उचलून नेलं; 36 तासांच्या शोधमोहिमेनंतर थेट...

घरी परतल्यावर मागितले अडीच लाख

पोलिसांनी याप्रकरणाचा तपास केल्यानंतर आर्शी बुधवारी संध्याकाळी तिच्या दीरासोबत घरी परतली. आर्शीच्या कुटुंबातील लोकही उज्ज्वल गार्डनमध्ये पोहोचले. त्यानंतर कुटुंबियांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी आर्शी, शाकिर आणि त्याच्या भावाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पोलीस ठाण्यातही त्यांच्यात वादविवाद झाला. आर्शीने म्हटलं की, ती तिच्या दीरासोबतच राहणार आहे. जर तिच्या पतीने घटस्फोट दिला तर अडीच लाख रूपये द्यावे लागतील.

महिलेनं सांगितलं पळून जाण्याचं खरं कारण 

आर्शीने म्हटलं की, तिने पतीसोबत दाढीविषयी कोणतीही चर्चा केली नव्हती. तिच्या पतीमध्ये काहीतरी कमी आहे, त्यामुळे दीरासोबत पळून गेली. शाकिरने म्हटलं की, जर पत्नीने माझी माफी मागितली, तर मी तिला माफ करेन. परंतु, आर्शीने माफी मागितली नाही आणि अडीच लाख रुपयांच्या मागणीवर अडून राहिली. त्यानंतर शाकिरने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला.

हे ही वाचा >> पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज; बीडच्या पोराला पुण्यात पकडलं, प्रकरण नेमकं काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp