Who is Taliban: तालिबानी कोण आहेत, काबूल ताब्यात घेतल्याने संपूर्ण जगाला का भरली आहे धडकी?
संपूर्ण जग शांतपणे पाहत राहिलं आणि अफगाणिस्तान पूर्णपणे तालिबानच्या हातात गेला. 15 ऑगस्ट 2021 च्या सकाळी जेव्हा लोक भारतात स्वातंत्र्य दिन साजरा करत होते तेव्हा तालिबानी अफगाणिस्तानची राजधानी काबूलला घेराव घालत होते आणि अफगाणी नागरिकांचे स्वातंत्र्यावर घाला घालत होते. गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या लढाईत, कंधार, हेरात, कुंडूज, जलालाबाद, बल्ख आणि उर्वरित अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात […]
ADVERTISEMENT
संपूर्ण जग शांतपणे पाहत राहिलं आणि अफगाणिस्तान पूर्णपणे तालिबानच्या हातात गेला. 15 ऑगस्ट 2021 च्या सकाळी जेव्हा लोक भारतात स्वातंत्र्य दिन साजरा करत होते तेव्हा तालिबानी अफगाणिस्तानची राजधानी काबूलला घेराव घालत होते आणि अफगाणी नागरिकांचे स्वातंत्र्यावर घाला घालत होते.
ADVERTISEMENT
गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या लढाईत, कंधार, हेरात, कुंडूज, जलालाबाद, बल्ख आणि उर्वरित अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात येत होते. परंतु राजधानी काबूल इतक्या लवकर तालिबान्यांच्या हाती पडेल असे कुणालाही वाटलं नव्हतं.
रविवारी सकाळी तालिबान्यांनी अचानक काबूलला वेढा घातला आणि अफगाणिस्तान सरकार आणि सैन्याने लढाईशिवाय आत्मसमर्पण केलं. दरम्यान, काबूलहून अमेरिकेच्या राजदूत आणि तेथील अधिकाऱ्यांना तात्काळ माघारी बोलावून घेतलं. यासाठी विशेष हेलिकॉप्टर पाठविण्यात आले होते.
हे वाचलं का?
मशीन गन आणि रॉकेट लाँचरसह सशस्त्र तालिबानी यांनी काबूल शहराला वेढा घातला होता. तालिबानने बगराम एअरबेस, बगराम जेल आणि काबूल शहराचे प्रवेशद्वार आणि परिसरातील अनेक महत्त्वाच्या इमारती ताब्यात घेतल्या आणि संध्याकाळी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी देश सोडून गेल्याच्या बातम्याही समोर आल्या.
यानंतर तालिबानच्या प्रवक्त्याने घोषणा केली की, तालिबानी शहरात शिरणार आहेत आणि कायदा व सुव्यवस्था आणि पोलीस चौक्या सांभाळणार आहेत. तालिबानने लष्कर आणि नागरिकांना सांगितलं आहे की, तालिबानी कोणाचाही बदला घेणार नाही.
ADVERTISEMENT
सर्वांना सुरक्षा पुरवली जाईल. परंतु काबूलच्या बाहेर जाण्यासाठी आता लोकांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली. लोक तालिबानी राजवटीखाली राहण्याऐवजी शहरातून पळून जाताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT
सत्ता हस्तांतरणासाठी मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलमध्ये
अफगाणिस्तान सरकार आणि लष्कराने आत्मसमर्पण करताच तालिबान कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदार दोहाहून काबूलला पोहोचला. त्यांनी थेट राष्ट्रपती भवन गाठले आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष घनी यांच्याशी सत्ता हस्तांतरणाबाबत चर्चा केली. यानंतर थोड्याच वेळात अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडला.
काबूलपासून पळून जाणारे नागरिक हे आता ताजिकिस्तान, इराण आणि इतर शेजारील देशात जात आहेत. 20 वर्षांपूर्वी ज्यांनी तालिबानचे अत्यंत भयंकर असे शासन पाहिलेले आहे ते लोकं आता अफगाणिस्तान सोडून कुठेही शरण घेण्यास तयार आहेत.
अफगाणिस्तानवर तालिबानी संकट निर्माण झालं तरी कसं?
अफगाणिस्तानमध्ये ज्या पद्धतीने राजवटी बदलल्या ते पाहता येथील एकूणच समाजव्यवस्था विचित्र असल्याचं जाणवतं. सुरुवातीला रशियाच्या मदतीने झहीर शाह याच्या राजवटीत अफगाणिस्तान हा एकेकाळी आधुनिकतेकडे वाटचाल करत होता. पण 1990 साली तालिबान्यांचे अत्यंत विचित्र शासन अस्तित्वात आलं.
अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकन आणि नाटो देश तालिबानच्या राजवटीतून मुक्त झाले आणि मागील वीस वर्षात हा देश आपल्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. पण याचवेळी आता तालिबानने पुन्हा डोके वर काढले. एप्रिल 2021 मध्ये अमेरिकेने घोषणा केली की आपले सैन्य सप्टेंबरपर्यंत परत बोलावेल. त्यानंतर तालिबानने हल्ला तीव्र केला आणि आता त्यांनी देशाची सत्ता हातात घेतली आहे.
जिथे-जिथे तालिबान्यांनी ताबा मिळवला तिथे शरिया कायदा, चाबकाचे कोडे मारण्याची शिक्षा, रस्त्यावर खुलेआम हत्या करणे, दाढी वाढवणे आणि स्त्रियांवर निर्बंध असल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण देश आता पुन्हा तालिबानच्या नियंत्रणाखाली आला आहे आणि लोकांना भीतीपोटी पुन्हा आपली घरे सोडून शेजारच्या देशांमध्ये पळून जाण्यास भाग पाडले जात आहे.
तालिबान म्हणजे काय, त्यांची ताकद कशी आहे?
अफगाणिस्तानातून रशियन सैन्याच्या माघारी गेल्यानंतर 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला उत्तर पाकिस्तानात तालिबानचा उदय झाला. पश्तो भाषेत तालिबान म्हणजे विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थी जे मूलगामी इस्लामिक धार्मिक शिक्षणापासून प्रेरित आहेत.
असे म्हटले जाते की कट्टरपंथी सुन्नी इस्लामिक विद्वानांनी पाकिस्तानमध्ये धार्मिक संस्थांच्या मदतीने आपला पाया रचला होता. तालिबानवर देवबंदी विचारसरणीचा पूर्ण प्रभाव आहे. तालिबानला उभे करण्यासाठी सौदी अरबकडून दिली जाणारी आर्थिक मदत जबाबदार मानली जाते. सुरुवातीला, तालिबानने घोषित केले की त्यांचा हेतू इस्लामिक भागातून परकीय शासन संपवणे, शरिया कायदा आणि इस्लामिक राज्य स्थापन करणे आहे.
सुरुवातीला, लोक सरंजामशाहीच्या अत्याचाराला कंटाळले होते, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे तालिबान हा आपल्यासाठी दिलासा देणारे आहेत असे येथील अनेक नागरिकांना वाटत होतं. परंतु नंतर धर्मांधपणामुळे तालिबानची लोकप्रियताही कमी झाली. परंतु तोपर्यंत तालिबान इतके शक्तिशाली झाले होते की, लोकांची त्याच्यापासून सुटका होण्याची आशा संपली होती.
रशिया-अमेरिका शीतयुद्धाचा बळी म्हणजे अफगाणिस्तान
सुरुवातीला अफगाणिस्तानात रशियाचा प्रभाव संपवण्यासाठी तालिबानच्या मागे अमेरिकेचे समर्थन असल्याचे मानले जात होते. 9/11 च्या हल्ल्यामुळे अमेरिकेला कट्टरपंथी विचारसरणीचा फटका बसू लागला. त्यामुळे अमेरिका स्वतःच त्यांच्याविरोधात युद्धात उतरला. पण काबूल-कंदहारसारख्या मोठ्या शहरांनंतर डोंगराळ आणि आदिवासी भागातून तालिबान्यांचा खात्मा करण्यात अमेरिकेसारख्या देशालाही जमलं नाही. गेल्या 20 वर्षात त्यांना तालिबान्यांचा समूळ नायनाट करताच आला नाही.
तालिबानचा नेता कोण आहे?
तालिबान ही कट्टर धार्मिक विचारांनी प्रेरित तरुण लढवय्यांची संघटना आहे. त्याचे बहुतेक सेनानी आणि कमांडर मौलवी आणि कबाली गटांचे प्रमुख आहेत. जे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा भागात स्थित कट्टर धार्मिक संघटनांमध्ये शिकलेले आहेत.
त्यांचा एकच उद्देश आहे, ते म्हणजे पाश्चिमात्य देशांचा प्रभाव राजवटीतून काढून टाकणे आणि देशात इस्लामिक शरिया कायदा प्रस्थापित करणे.
मौलवी हिब्तुल्लाह अखुंजादा हा तालिबानचा प्रमुख आहे. आधी मुल्ला ओमर आणि नंतर 2016 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मुल्ला मुख्तार मन्सूर याचा खात्मा झाल्यापासून हिब्तुल्लाह अखुंजादा हा तालिबान्यांचा प्रमुख बनला आहे.
हिब्तुल्लाह हा कंदहारमध्ये एक मदरसा चालवत होता आणि तालिबानच्या युद्ध कारवायांच्या बाजूने फतवे जारी करायचा. 2001 पूर्वी अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीत तो न्यायालयांचा प्रमुख होता.
Taliban surrounded Kabul, I were to bank to get some money, they closed and evacuated;
I still cannot believe this happened, who did happen.
Please pray for us, I am calling again:
Hey ppl of the this big world, please do not be silent , they are coming to kill us. pic.twitter.com/wIytLL3ZNu
— Sahraa Karimi/ صحرا كريمي (@sahraakarimi) August 15, 2021
20 वर्षांनंतर तालिबान इतके मजबूत कसे झाले?
2001 मध्ये सुरू झालेल्या अमेरिकन आणि सहयोगी सैन्याच्या कारवायांमध्ये तालिबानला फक्त डोंगराळ भागात जाण्यास भाग पाडण्यात आले होते. परंतु अमेरिकेला काही त्यांचा समूळ नायनाट करता आला नव्हता.
पण 2012 मध्ये नाटो तळावरील हल्ल्यानंतर तालिबानचा पुन्हा उदय झाला होता. 2015 मध्ये तालिबानने सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा समजला जाणाऱ्या कुंडूजवर ताबा मिळवला होता. ही अशी वेळ होती की, जेव्हा अमेरिकेत सैन्य मागे घेण्याची मागणी जोर धरत होती.
अफगाणिस्तानात अमेरिकेचा रस कमी झाला आणि तालिबान मजबूत झाला. यासह पाकिस्तानी दहशतवादी संघटना, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय गुप्तचरांच्या मदतीने तालिबानने पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या भागात आपले तळ मजबूत केले.
2020 मध्ये, अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याचा प्रयत्नांचा एक भाग म्हणून, अमेरिकेने तालिबानशी शांतता चर्चा सुरू केली आणि दोहामध्ये अनेक चर्चेच्या फेऱ्याही झाल्या. एकीकडे तालिबानने थेट चर्चेचा मार्ग स्वीकारला आणि दुसरीकडे मोठी शहरे आणि लष्करी तळांवर हल्ला करण्याऐवजी छोट्या भागांवर कब्जा करण्याच्या रणनीतीवर काम करण्यास सुरुवात केली.
एप्रिल 2021 मध्ये जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्य मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर तालिबान्यांनी आपला मोर्चा उघडला आणि केवळ 90 हजार तालिबानी असणाऱ्या संघटनेने 3 लाखाहून अधिक सैन्य असणाऱ्या अफगाणी लष्कराला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं.
Afghan Defence Minister Says ‘….त्यांनी देश विकला’ राष्ट्राध्यक्ष Ashraf Ghani यांच्यावर आरोप
अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात, भारताची स्थिती संवेदनशील
अफगाणिस्तान हा तालिबान्यांच्या हातात गेल्याने भारतातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. भारताने गेल्या 20 वर्षांत अफगाणिस्तानच्या विकासात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली होती.
भारताने शाळा, रुग्णालये, वीज आणि वायू संयंत्रांसह अनेक मोठ्या प्रकल्पांवर बराच खर्च केला होता. परंतु आता हे सर्व तालिबानी राजवटीच्या आगमनाने संपुष्टात येण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
एअर इंडियाच्या अनेक विमानांनी अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या भारतीयांना माघारी आणलं जात आहे. तसेच येथे असणाऱ्या राजदूताना सुरक्षित परत आणण्याचं देखील एक मोठं आव्हान भारतासमोर आहे. तालिबान राजवटीतच कंदहार विमान अपहरण घडलं होतं. ज्याचे परिणाम भारत आजही भोगत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT