Sidharth Shukla: कोण होता सिध्दार्थ शुक्ला, कसं होतं त्याचं करिअर?
मुंबई: बिग बॉस सिझन 13 (Bigg Boss) चा विजेता आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता सिध्दार्थ शुक्ला (sidharth shukla) याचं आज (2 सप्टेंबर) सकाळच्या सुमारास निधन झाल्याचं वृत्त समोर आलं. अवघ्या 40 वर्षाचा असलेल्या सिध्दार्थ शुक्लाच्या या अकाली एक्झिटने बॉलिवूडसह, टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. आपण एक नजर टाकूया.. सिध्दार्थ शुक्लाच्या करिअरवर सिध्दार्थ शुक्ला […]
ADVERTISEMENT
मुंबई: बिग बॉस सिझन 13 (Bigg Boss) चा विजेता आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता सिध्दार्थ शुक्ला (sidharth shukla) याचं आज (2 सप्टेंबर) सकाळच्या सुमारास निधन झाल्याचं वृत्त समोर आलं. अवघ्या 40 वर्षाचा असलेल्या सिध्दार्थ शुक्लाच्या या अकाली एक्झिटने बॉलिवूडसह, टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
आपण एक नजर टाकूया.. सिध्दार्थ शुक्लाच्या करिअरवर
सिध्दार्थ शुक्ला हा बिग बॉस सिझन 13 चा जरी विजेता असला तरी.. त्यापूर्वीच तो टीव्ही इंडस्ट्रीतील एक स्टार आणि लोकप्रिय अभिनेता होता. दमदार पसर्नलिटी आणि उत्तम अभिनयामुळे सोशल मीडियाच नाही तर देशभर सिध्दार्थची तगडी फँन फॉलोओईंग होती.
हे वाचलं का?
12 डिसेंबर 1980 रोजी सिध्दार्थचा जन्म मुंबईत झाला होता. त्याने आपल्या करिअरची सुरवात मॉडलिंगने केली होती. 2004 साली सिध्दार्थचं छोट्या पडद्यावर पदार्पण झालं होतं. ‘बाबूल का आंगन छूटे ना’ या सिरीयलपासून त्याच्या करिअरला सुरवात झाली होती. मात्र, सिध्दार्थला खरी ओळख मिळाली ती ‘बालिका वधू’ या लोकप्रिय मालिकेमुळे.
या मालिकेत त्याची जोडी जमली ती अविका गौरशी.. अभिनेत्री अविका गौर आणि सिध्दार्थच्या जोडीने त्याकाळात रसिक प्रेक्षकांवर गारूड केलं होतं.
ADVERTISEMENT
टीव्हीच्या छोट्या पडद्यावर जबरदस्त यश मिळवल्यानंतर सिध्दार्थची गाडी बॉलिवूडकडे वळली… करण जोहरच्या हम्पटी शर्मा की दुल्हनिया या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये ग्रँड एंट्री घेतली. यात त्याने वरूण धवन आणि आलिया भटच्या तोडीस तोड काम करून रसिकांची मनं जिंकली होती.
ADVERTISEMENT
सिध्दार्थ शुक्लाची फँन फाँलोऑईंग जबरदस्त वाढली ती बिग बॉसच्या 13व्या सीझनमुळे.. हा बिग बॉसचा सिझन सिध्दार्थ शुक्लाने जिंकला आणि यातल्या त्याच्या परफॉर्मनसमुळे तो घराघरात जाऊन पोहचला. या सीझनमध्ये त्याची जोडी अभिनेत्री शहनाज गिलबरोबर जमली. याबद्दल सोशल मीडियावरही जबरदस्त चर्चाही झाली होती.. तिच्याबरोबर नंतर सिध्दार्थने अनेक म्युझिक व्हीडिओही केले होते.
शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला या कार्यक्रमात एकत्र दिसले होते. ज्या बिग बॉसने सिद्धार्थला प्रसिद्धी दिली, यश मिळवून दिलं दु्र्दैवाने त्याच कार्यक्रमातली त्याची झलक शेवटची झलक ठरली. सिद्धार्थ आणि शहनाज या दोघांमधली चांगली केमिस्ट्री यावेळी पाहण्यास मिळाली होती. सिद्धार्थ शुक्लाने बालिका वधू या सीरियलध्ये शिवची भूमिका करत होता. सिद्धार्थ शुक्लाने काही सिनेमांमध्येही काम केलं होतं. काही प्रोजेक्ट येणारही होते. त्याचं करीअर ऐन भरात असताना सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं.
Breaking: बिग बॉस 13 विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, 40 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
अश्या लोकप्रिय अभिनेत्याने अशी अकाली एक्झिट घेतल्याने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीच नाही तर त्याच्या फँन्सनाही खूप मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT