प्रवीण परदेशी गोव्यातल्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांच्या सदिच्छा भेटीला का गेले होते ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी अशी ओळख असलेले सनदी अधिकारी प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) यांना ठाकरे सरकारने २०२० मध्ये म्हणजेच कोरोना काळात हटवलं होतं. आता हेच प्रवीण परदेशी गोव्यातल्या हॉटेलमध्ये होते. त्याच हॉटेलमध्ये प्रवीण परदेशी गेले होते जिथे शिवसेनेचे सगळे बंडखोर आमदार थांबले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी फेसबुकवर त्यांचे फोटो पोस्ट केले आहेत ज्यामुळे ही चर्चा रंगली आहे.

ADVERTISEMENT

२१ जूनला जे बंड महाराष्ट्रात झालं आणि त्यानंतर जे सत्तानाट्य सुरू झालं त्यात विविध प्रकारचे ट्विस्ट अँड टर्न महाराष्ट्राने पाहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देईपर्यंत अनेक राजकीय घडामोडी नाट्यमय रित्या घडल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता याच फडणवीस यांचे अत्यंत जवळचे अधिकारी गोव्यात बंडखोर आमदारांच्या सदिच्छा भेटीला का गेले होते याची चर्चा रंगली आहे.

पंतप्रधान कार्यालयाचे सचिव असलेले प्रवीण परदेशी गोव्यातल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या भेटीला हॉटेलमध्ये गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाकरे सरकार सत्तेत असताना २०२० मध्ये म्हणजेच कोरोना काळात आयुक्तपदावरून प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली होती. मुंबईतली कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यात अपयशी ठरल्याचा ठपका प्रवीण परदेशी यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर प्रवीण परदेशी यांची नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली होती.

हे वाचलं का?

प्रवीण परदेशी यांनी मे २०१९ मध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्याही आधी प्रवीण परदेशी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं होतं. परदेशी यांनी त्यांच्या ३० वर्षांहून जास्त कार्यकाळात लातूर तसंच सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलंय.

कोण आहेत प्रवीण परदेशी?

ADVERTISEMENT

प्रवीण परदेशी हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत

ADVERTISEMENT

प्रवीण परदेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात ग्लोबल प्रोग्राम को-ऑर्डिनेटर म्हणूनही काम पाहिलंय

प्रवीण परदेशी यांनी २०१९ मध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला होता

प्रवीण परदेशी हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या लोकांपैकी एक अधिकारी असल्याचं मानलं जातं

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना प्रवीण परदेशी यांनी मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, अर्थ, नगरविकास तसंच महसूल या खात्यांमध्ये जबाबदारी सांभाळली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लगेच प्रवीण परदेशी यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून आणलं होतं.

ठाकरे सरकारने प्रवीण परदेशी यांना जेव्हा मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी काही तासातच राजीनामा दिला त्यानंतर ते केंद्र सरकारच्या नॅशनल कॅपसिटी बिल्डिंग कमिशनचे सदस्य म्हणून रूजू झाले. हेच प्रवीण परदेशी गोव्यातल्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांची सदिच्छा भेट घेण्यासाठी नेमके का गेले असावेत? याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT