Why I Killed Gandhi या सिनेमावर बंदी घाला, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचं पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Why I Killed Gandhi या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. असोसिएशनने या संदर्भातलं एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. 30 जानेवारीला म्हणजेच महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रिलिज होणार आहे. मात्र हा सिनेमा कुठेही OTT प्लॅटफॉर्मवर किंवा कुठेही रिलिज होऊ नये अशी विनंती या सिनेमाबाबत करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे आधीच या सिनेमावरून वाद निर्माण झाला आहे. अशात आता हा सिनेमा रिलिज केला जाऊ नये अशीच विनंती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे ‘नथुराम गोडसे’ का झाले?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Why I Killed Gandhi? नावाच्या लघुपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ही भूमिका साकारली आहे. अमोल कोल्हे यांनी 2017 मध्ये ही भूमिका केली आहे. मात्र त्याचा ट्रेलर नुकताच युट्यूबवर रिलिज झाला आहे. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. त्यांच्या या भूमिकेला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. तर शरद पवारांनी मात्र अमोल कोल्हेचं समर्थन केलं आहे. एवढंच नाही तर सिने कलाकार नाना पाटेकर यांनीही या सिनेमातील भूमिकेचं समर्थन केलं आहे.

NCP खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, चर्चांना उधाण

ADVERTISEMENT

अमोल कोल्हेंचं म्हणणं काय?

ADVERTISEMENT

माझ्यासमोर why i killed gandhi या हिंदी सिनेमाची ऑफर आली. हिंदीतला प्लॅटफॉर्म मिळणं ही मला मोठी गोष्ट वाटली. त्यांनी मला जेव्हा सांगितलं की मला नथुराम साकारायचा आहे तेव्हा माझ्या मनात काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. दिग्दर्शक अशोक त्यागी यांच्याशी मी चर्चा केली. त्यांनी मला हे सांगितलं की जी कोर्ट ट्रायल झाली त्यात नथुरामने जी भूमिका मांडली ती तुम्हाला करायची आहे. त्यांना त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं होतं की नथुरामचं उदात्तीकरण होईल अशी भूमिका मी कधीही घेतलेली नाही. महात्मा गांधी यांच्या हत्येचं समर्थन करणं हे धादांत न पटणारी गोष्ट आहे. कारण कोणत्याच हत्येचं समर्थन होऊ शकत नाही. त्यांनी मला तेव्हा सांगितलं की तुम्ही फक्त ही भूमिका एक कलाकार म्हणून साकारत आहात.’

‘त्यांनी मला हे सांगितल्यानंतर मी विचार केला की अनेकदा वैचारिक भूमिका वेगळी असतानाही कलाकार विविध भूमिका साकारत असतात. रावणाचीही भूमिका केली जाते, कंसाचीही भूमिका केली जाते, गँगस्टरचीही भूमिका केली जाते. याचा अर्थ तो कलाकार त्या विचारधारेशी सहमत असतो का? तर तसं नाही. त्यामुळे एखादी भूमिका साकारली म्हणजे त्या विचारधारेचा शिक्का कुणा कलाकारावर मारला जावा हे योग्य नाही. निळू फुले, प्रभाकर पणशीकर यांनी अनेक खलनायक अजरामर करून ठेवले आहेत. विचारधारा पटत नसतानाही त्यांनी य़ा भूमिका साकारली. त्यानंतर दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात काही वाद झाले आणि हा सिनेमा रिलिज होणार नाही असं मला तेव्हा कळलं होतं.’ मात्र आता हा सिनेमा रिलिज होतो आहे. त्यामुळे तो वादात सापडला आहे. अशात ता सिने वर्कर्स असोसिएशनच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT