उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला आवर्जून आलेल्या CM स्टॅलिन यांच्यावर शिवसेनेने का केलीय टीका?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा हा अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडीनंतर पार पडला होता. याच शपथविधी सोनिया गांधींपासून देशातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळी अनेक नेत्यांनी या शपथविधीपासून दूर राहणंच पसंत केलं होतं. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असल्याने त्यांच्यापासून दोन हात दूरच राहावं अशी भूमिका अनेक सेक्युलर पक्षांनी घेतली होती. पण असं असताना तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम. के. स्टॅलिन हे मात्र उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला आवर्जून हजर राहिले होते. पण आता त्याच एम. के. स्टॅलिन यांच्यावर शिवसेनेने घणाघाती हल्ला चढवला आहे.उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला आवर्जून उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर आता कोणत्या मुद्द्यावरुन शिवसेनेची घणाघाती टीका केली आहे?

ADVERTISEMENT

एम. के. स्टॅलिन यांनी राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषी के. जी पेरारिवलन याची भेट घेतल्याने शिवसेनेने आपलं मुखपत्र ‘सामना’तून जोरदार टीका केली आहे.

पाहा सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

हे वाचलं का?

  • राजीव गांधींच्या खुन्यांचा सन्मान करून एम.के. स्टॅलिन यांनी नेमके काय साध्य केले? राजीव गांधी यांची हत्या हा धक्काच होता, पण गांधींच्या खुन्यांचा सन्मान हा त्यापेक्षा मोठा धक्का आहे. राजकारणासाठी ‘वाट्टेल ते’ हे प्रयोग कधी थांबणार? नव्हे, ते थांबायलाच हवेत.

  • पंतप्रधानांच्या खुन्यांना प्रतिष्ठा देणे हा घातक पायंडा आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या नव्या पायंडय़ाला विरोध करायला हवा!

  • ADVERTISEMENT

  • राजकारण कितीही अमानुष असले तरी किमान सभ्यता व सुसंस्कृतपणा टिकवायलाच हवा. दुर्दैवाने आज तसे घडताना दिसत नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगार ए. जी. पेरारिवलन याची 31 वर्षांनंतर कोर्टाने सुटका केली. राजीव गांधी हत्या प्रकरणात पेरारिवलन यास 50 वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

  • ADVERTISEMENT

  • खरे तर आधी त्यास फाशीच ठोठावण्यात आली होती, पण आजन्म जन्मठेपेपर्यंत शिक्षा झाली. आता 31 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाने त्याची सुटका केली. पेरारिवलनच्या आईने आपल्या मुलासाठी मोठी कायदेशीर लढाई केली. त्यात तिला अखेर यश आले.

  • निवडणूक प्रचार दौऱ्यावर असताना तामीळनाडूतील श्रीपेरुम्बुदूर येथे ‘लिट्टे’च्या मारेकऱ्यांनी मे, 1991 मध्ये राजीव गांधी यांची हत्या केली. मानवी बॉम्बचा वापर त्यासाठी झाला. तो बॉम्ब बनविण्यासाठी शक्तिशाली बॅटरी बनविण्याचे व पुरविण्याचे काम पेरारिवलन याने केल्याचा आरोप होता. आता पेरारिवलन 31 वर्षांनी सुटला हे ठीक, पण पेरारिवलन सुटल्याबरोबर तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या भेटीस गेला. दोघांनी गळाभेट घेतली.

  • स्टॅलिन यांनी पेरारिवलनचा सन्मान केला. पेरारिवलन याचा उल्लेख स्टॅलिन यांनी ‘भाई’ असा केला. पेरारिवलनला उत्तम भविष्य असल्याचे विधान स्टॅलिन यांनी करावे हे आश्चर्यच आहे. तामीळनाडू काँग्रेस व डीएमके पक्षाची युती आहे हा भाग वेगळा, पण देशाच्या माजी पंतप्रधानांच्या हत्या प्रकरणातील आरोपीस असे मिठी मारून भेटणे, त्याचा सन्मान करणेकोणत्या राजकीय संस्कृतीत बसते?

  • पंजाबात एकेकाळी अनेकांची हत्या करणाऱ्या खलिस्तानवाद्यांचे सन्मान केले जात असत, पण इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरातच रणगाडे घुसवून अतिरेक्यांचा बीमोड केला. राजकारणात सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घुसले आहेत व त्यांना मानसन्मानही दिला जातो. अगदी मंत्रीपदावरही ते विराजमान होत आहेत, पण देशाच्या पंतप्रधानांची हत्या करणाऱ्या आरोपीचा सन्मान करणे हा प्रकार भयंकर आहे.

  • क्रोनोलॉजी समझिये… राजीव गांधीच्या हत्येतील दोषीला झालेली फाशीची शिक्षा, मग सुटका कशी?

    • इंदिरा गांधींच्या हत्याऱ्यांना शहीदांचा दर्जा देण्याचा प्रयत्न त्या काळात झाला, पण लोकांनीच तो हाणून पाडला. कश्मीरातील अतिरेक्यांनाही ‘स्वातंत्र्यसैनिक’ वगैरे ठरविण्याचा प्रयत्न झाला. अफझल गुरू, बुरहान वाणी यांना तर शहीदांचा दर्जा देण्याचे काम कश्मीरातील राजकारण्यांनी केले. महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्यांच्या प्रतिमेचे पूजनही होत असते, पण त्यास लोकमान्यता नाही. त्यामुळे राजीव गांधी यांच्या खुन्यांना प्रतिष्ठा देऊन एम. के. स्टॅलिन यांना काय सिद्ध करायचे आहे?

    • राजीव गांधी हे देशाचे तरुण पंतप्रधान होते. मुळात ते पक्के बनेल राजकारणी नव्हते. अपघाताने राजकारणात आले व पंतप्रधानही झाले, पण पंतप्रधान म्हणून त्यांची कामगिरी देशाला आधुनिकतेकडे नेणारी होती. आजच्या डिजिटल क्रांतीचे ते जनक आहेत हे मान्यच करायला हवे. राजीव गांधी यांनी आधुनिक राष्ट्राचे एक स्वप्न पाहिले व त्या दिशेने ते काम करीत होते. त्यांच्याच जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांना दगा दिला व ते निवडणुकीत पराभूत झाले.

    • 1991 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी ते तामीळनाडूत प्रचारास गेले व तेथेच मानवी बॉम्बचा वापर करून त्यांची हत्या झाली. त्यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर असतानाही त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. राजीव गांधी यांचे व्यक्तिमत्त्व लोभस आणि प्रसन्न होते. त्यांची लोकप्रियता अफाट होती. श्रीलंकेतील अंतर्गत राजकारणातून राजीव गांधींची हत्या झाली. त्यात तामीळनाडूचा एक वेगळा ‘कोन’ आहे.

    • तामीळनाडूच्या राजकारणात जयललिता यांचा अण्णा द्रमुक व करुणानिधी यांचा द्रमुक या पक्षांमध्ये नेहमीच टोकाचा संघर्ष राहिला. श्रीलंकेतील तामीळ जनतेच्या लढय़ास द्रमुककडून सशस्त्र रसद पुरविण्यात आली, तर जयललितांचा या भूमिकेस व खासकरून ‘लिट्टे’च्या तामीळनाडूतील अस्तित्वास विरोध होता. त्यामुळे जयललिता या ‘लिट्टे’च्या हिटलिस्टवर होत्या. श्रीलंकेतून ‘लिट्टे’चा पुरता बीमोड नंतर झाला.

    • प्रभाकरन यालाही ठार करण्यात आले. ‘लिट्टे’चे अस्तित्व संपूर्णपणे नष्ट झाले. राजीव गांधींच्या हत्येनंतर ‘लिट्टे’ची उतरती कळा सुरू झाली ती झालीच.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT