कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे, तरीही भारतात पेट्रोल-डिझेलची दरवाढ का होत नाहीये?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रशिया आणि युक्रेन यांच्यातील लढाईचे परिणाम अनेक देशांना भोगावे लागत आहे. या युद्धाचा परिणाम हा सर्वाधिक कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला आहे. युद्ध सुरु झाल्यापासून कच्च्या तेलाचे दर हे तब्बल 100 डॉलर प्रति बॅरल एवढं पोहचलं आहे. परंतु असं असताना देखील भारतात गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरात फारशी वाढ झालेलीच नाही. याचं मुख्य कारण म्हणजे देशाच्या पाच राज्यातील निवडणुका.

ADVERTISEMENT

सध्या देशात पेट्रोलचे दर हे सरासरी 109 रुपये एवढे आहे. तर डिझेल 94 रुपये आहे. मागील काही वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सोन्याच्या दराप्रमाणे दररोज कमी-जास्त होतात. मात्र, गेल्या अडीच महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात फारसे बदलच झाले नसल्याचं दिसून येत आहे.

अनेकांच्या मते, पाचही राज्यातील निवडणुका या भाजपसाठी अतिशय महत्त्वाच्या समजल्या जात आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी केंद्र सरकारने काही काळ पेट्रोल-डिझेलची दरवाढ रोखून धरण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे. आता असं नेमकं का म्हटलं जात आहे याबाबत काही उदाहरणं देखील समोर आहेत. त्याचविषयी जाणून घेऊयात सविस्तरपणे.

हे वाचलं का?

बिहार निवडणूक:

  • 25 सप्टेंबर 2020 रोजी निवडणुकीची घोषणा झाली आणि 10 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.

ADVERTISEMENT

  • 25 सप्टेंबरपासून 19 नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच होते.

  • ADVERTISEMENT

  • या कालावधीत क्रूड ऑईलचे दर हे प्रति बॅलर 41.35 डॉलरवरुन 43.34 डॉलर एवढे झाले होते. मात्र तरीही देशात पेट्रोलचे दर हे स्थिरच होते.

  • दरम्यान, 20 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ सुरु झाली आणि पुढील 18 दिवसात तब्बल 15 वेळा दरवाढ झाली होती.

  • बंगाल निवडणूक:

    • 26 फेब्रुवारी 2021 रोजी निवडणुकीची घोषणा झाली होती आणि 2 मे 2021 रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.

    • 28 फेब्रुवारीपासून ते 3 मेपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच होते.

    • या कालावधीत क्रूड ऑईलचे दर हे प्रति बॅलर 61.22 डॉलरवरुन 64.73 डॉलर एवढे झाले होते. मात्र तरीही देशात पेट्रोलचे दर हे स्थिरच होते.

    • दरम्यान, 4 मेपासून पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ सुरु झाली आणि पुढील 75 दिवसात तब्बल 41 वेळा दरवाढ झाली होती.

    पेट्रोल-डिझेलचे दर 25-30 रूपये कमी केले असते तर मोठं मन दिसलं असतं-संजय राऊत

    उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक:

    • 8 जानेवारी 2022 रोजी निवडणुकीची घोषणा झाली आणि 10 मार्चला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

    • संपूर्ण निवडणुकीदरम्यान आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

    • खरं तर या कालावधीत क्रूड ऑईलचे दर हे प्रति बॅलर 73.30 डॉलरवरुन थेट 100 डॉलर एवढे झाले आहे. मात्र तरीही देशात पेट्रोलचे दर अद्यापही स्थिरच आहेत.

    • दरम्यान, आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, निवडणुकीनंतर टॅक्समध्ये कपात न केल्यास पेट्रोल-डिझेलच्या दरात एका लीटरमागे तब्बल 15 ते 20 रुपयांची वाढ होऊ शकते. त्यामुळे पेट्रोल 130 आणि डिझेल 100 रुपयांच्या देखील पुढे जाऊ शकते.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT