शिंदे गटाने आदित्य ठाकरेंनाच नोटीस का दिली नाही?; आमदार भरत गोगावलेंनी केला खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात सत्तांतर झालं असलं, तरी शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. आता शिंदे गटातील आमदारांकडून खासदार संजय राऊताना लक्ष्य केलं जाताना दिसत आहे. आमदार भरत गोगावले यांनी राऊतांनी केलेल्या विधानांवर नाराजी व्यक्त केलीये. त्याचबरोबर व्हीप पाळला नाही म्हणून आमदारांविरुद्धच्या कारवाईतून आदित्य ठाकरेंना का वगळण्यात आलं, याबद्दलही भूमिका मांडलीये.

ADVERTISEMENT

टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी बंड करण्यामागची भूमिका मांडलीये. सद्य निर्माण झालेल्या स्थितीवर ते म्हणाले, “११ जुलैला सगळं स्पष्ट होईल. सर्वांना कल्पना आहे की, दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे. त्यात वाढ होत चाललीये. ती कमी होणार नाही. वस्तुस्थिती, परिस्थिती बाकीच्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्यानुषंगाने चालावं. सद्यस्थिती डोळ्यासमोर ठेवून जो चालेल तोच पुढे जाईल अन्यथा जय महाराष्ट्र होऊ शकतो,” असा इशारा भरत गोगावले यांनी दिला.

कारवाई करण्यात येणाऱ्या आमदारांच्या यादीतून आदित्य ठाकरेंना का वगळलंय? या प्रश्नावरही भरत गोगावले म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यानुसारच केलंय. आम्ही सगळ्याच गोष्टी विसरलो असं नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आदित्य ठाकरेंना बाजूला ठेवून १४ जणांना नोटीस बजावू.”

हे वाचलं का?

संजय राऊत यांच्यामुळे वेगळा गट केला, असं विधान शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनी केलं आहे. संजय राठोडांच्या भूमिकेचं भरत गोगावलेंनी समर्थन केलंय. “संजय राऊत काय बोलत आहेत, त्याचे परिणाम काय होताहेत माध्यमांना आमच्यापेक्षा जास्त माहितीये. संजय राठोड जे म्हणाले की, संजय राऊतांमुळे वेगळा गट केला, ही वस्तुस्थिती आहे. चूक काहीही नाही. शिवसेनेचे ४० आमदार आणि आमच्यासोबतचे अपक्ष आमदार हेच सांगत आले आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बराचसा वेळ दिला होता. ते सांगत होते की, अजूनही काही वेळ गेलेली नाही. आम्ही त्यांची वाट पाहत होतो आणि एकीकडे आमच्या लोकांची पदं काढून घेतली जात होती. संजय राऊतांची जी वक्तव्ये होती, ती काळजाला घरं पाडणारी होती. लोकांना चीड आणणारी होती.”

“उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत चर्चा करायला मिलिंद नार्वेकरांना पाठवलं. दुसरीकडं आमची पदं काढून घेतली. संजय राऊत तोंडाला येईल, ते बोलत होते. त्यामुळे आम्हाला काही कळत नव्हतं. त्यामुळे एक एक पाऊल पुढे पडत गेलं. आम्ही एकनाथ शिंदे निर्णय घ्यायला लावला. काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा, असं त्यांनी सांगितलं. पण, काहीही ऐकून न घेता संजय राऊत यांचा वन मॅन शो सुरू होता,” असं भरत गोगावलेंनी म्हटलंय.

ADVERTISEMENT

“संजय राऊतांनी नेमकी कुणाची सुपारी घेतलीये माहिती नाही?”

ADVERTISEMENT

“त्यांना वाटलं मागच्या वेळी (२०१९) जशा घडामोडी घडल्या, तशाच यावेळी होतील. यावेळी तसं नव्हतं. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर पाईक आहोत, त्यामुळे मोडेन पण वाकणार नाही, अशी भूमिका घेऊन आम्ही पुढे जात होतो. त्यांना हे समजलं पाहिजे होतं. संजय राऊतांनी नेमकी कुणाची सुपारी घेतली होती, हे आम्हाला काही कळलं नाही,” असा आरोप गोगावलेंनी केला.

“आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचं ब्रीद वाक्य घेऊन पुढे चाललोय. बाळासाहेबांना, दिघे साहेबांना दैवत मानून आम्ही पुढे चाललो आहोत. शिवसेना सोडली नाही. सोडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात हे सांगितलं आहे. त्यामुळे ज्यांना वाटेल की, आम्ही शिवसेनेला पुढे घेऊ जातोय, तर ते एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करतील. छोटे पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. तशी आमची वाटचाल सुरू आहे. १२ खासदार संपर्कात आहेत की नाही याची कल्पना एकनाथ शिंदे यांनाच असेल,” असं ते म्हणाले.

“उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांची मातोश्री वेगवेगळी”

मातोश्रीवर जाण्याबद्दलच्या प्रश्नावर भरत गोगावले म्हणाले, “मातोश्री हे ठिकाण कुणाचं आहे बाळासाहेबाचं. मातोश्री उभी कुणी केली बाळासाहेबांनी. उद्धव ठाकरे यांनी त्याच्यासमोर नवीन मातोश्री तयार केलीये. त्यामुळे ही मातोश्री बाळासाहेबांची आहे. संजय राठोड यांनी जे सांगितलं त्यावर आम्हाला विचार करावा लागेल. बाळासाहेबांची मातोश्री ती मजल्यांची आहे, तर उद्धव ठाकरे यांची मातोश्री आठ मजल्यांची आहे. त्यामुळे आठ मजले आम्हाला चढता येणार नाही. तीन मजले आम्ही चढू शकतो,” असं भरत गोगावले म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT