Constitution : डॉ. बाबासाहेब अंबेडकर संविधान जाळायला का तयार होते?

मुंबई तक

Republic Day : 15 ऑगस्ट 1947 (Indian Independence Day) रोजी आपण भारतीयांना ब्रिटीश (British) राजवटीतून स्वातंत्र्य (Freedom) मिळाले. देशाची राज्यघटना (Indian Contitution) तयार करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यासाठी 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची स्थापना झाली. अनेक प्रक्रिया पार करून भारतीय राज्यघटना सध्याच्या स्वरूपात आली आहे. भारतीय संविधानाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Republic Day : 15 ऑगस्ट 1947 (Indian Independence Day) रोजी आपण भारतीयांना ब्रिटीश (British) राजवटीतून स्वातंत्र्य (Freedom) मिळाले. देशाची राज्यघटना (Indian Contitution) तयार करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यासाठी 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची स्थापना झाली. अनेक प्रक्रिया पार करून भारतीय राज्यघटना सध्याच्या स्वरूपात आली आहे. भारतीय संविधानाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. (Some interesting facts related to Indian Constitution)

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना संमत आणि स्वीकारण्यात आली. हा दिवस संविधान दिन किंवा राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून ओळखला जातो. देशाच्या संविधानाचा स्वीकार केल्याच्या निमित्ताने आपण हा दिवस साजरा करतो. 26 जानेवारी 1950 रोजी देशात भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. म्हणूनच आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

संविधान लागू करण्यासाठी 26 जानेवारी ही तारीख निवडण्यामागे एक ऐतिहासिक कारणही होते. वास्तविक, 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताला पूर्ण स्वराज म्हणून घोषित केले होते. या तारखेला महत्त्व देण्यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू करण्यात आली.

संविधान म्हणजे काय?

मुळात संविधान हा कोणत्याही देशाचा सर्वोच्च ग्रंथ असतो. हे असे पुस्तक आहे ज्यावर देशाची घटनात्मक रचना आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, देशाच्या सामाजिक, राजकीय आणि न्यायव्यवस्थेला दिशा देण्यासाठी नियम लिहिलेले हे पुस्तक आहे. राज्यघटनाच सांगते की समाज चालवण्याचा आधार काय असावा? देशातील प्रत्येक नागरिकाचे हक्क कसे सुरक्षित करायचे? कोणत्याही व्यक्तीच्या अधिकारांचे उल्लंघन होता कामा नये. सर्वांना पुढे जाण्याची समान संधी मिळाली पाहिजे.

हे वाचलं का?

    follow whatsapp