महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या तीन आठवड्यांत आटोक्यात येईल? प्रदीप आवटेंनी दिलं उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हर्षदा परब : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या भीतीदायक वेगाने वाढतेय. पण ही भीतीदायक वाटणारी संख्या दिलासादायक ठरु शकेल काऱण येत्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ शकेल अशी असं मत व्यक्त करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. राज्यात 7 एप्रिलला 59 हजार 907 कोरोना रुग्ण आढळले होते. राज्यात एकूण 2 लाख 31 हजार 250 व्यक्तीच्या कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी 59 हजार 907 व्यक्तींच्या नमुने कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह. राज्यात 7 एप्रिल रोजी पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्के होता. तो 15 मार्चला 13.23 टक्के होता.

पण या आधी फेब्रुवारी महिन्यात अमरावती आणि अकोला जिल्ह्यामध्ये अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. ती इतकी वाढली की तिथे लॉकडाऊन करण्याची वेळ आली. तेव्हा महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या कमीच होती. आता जेव्हा राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय अमरावती अकोला या भागांमधील कोरोना रुग्णांची संख्या आणि तिथला पॉझिटिव्हिटी रेट राज्याच्या आणि इतर राज्यातील जिल्ह्यांच्या तुलनेत कमीच आहे.

हे वाचलं का?

दोन ते तीन दिवसात रुग्णसंख्या कमी येईल?

ADVERTISEMENT

राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील साथरोग सर्व्हेलन्स अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी पुढच्या दोन ते तीन आठवड्यात रुग्णसंख्या कमी होणं अपेक्षित आहे अशी माहिती दिली. यापूर्वी 2020 सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आणि त्यानंतर ती कमी होताना दिसली होती. तोच कल (trend) आता दिसू शकतो.

ADVERTISEMENT

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय तिथे आता रुग्णसंख्या कमी होतेय?

राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 26 च्या आसपास आहे. अहमदनगर, नाशिक, ठाणे, नागपूर, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. अमरावती, जळगाव, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 7 टक्क्यांवर आलाय. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढीची सुरुवात झाली होती त्या जिल्ह्यांमध्ये आता रुग्णसंख्या ओसरताना दिसतेय.

टेस्ट वाढल्यामुळे रुग्ण वाढत आहेत?

हे खरं आहे. राज्यातल्या टेस्टच प्रमाण फेब्रुवारीच्या तुलनेत सुमारे 3 ते साडे तीन टक्क्यांनी वाढलंय. फेब्रुवारीमध्ये आपण सुमारे 60 हजार टेस्ट दिवसाला करायचो आता दोन लाखांच्या आसपास टेस्ट करतोय. पॉझिटिव्हिटी कम्युनिटीमध्ये आहे हे खरं आहे. म्हणून टेस्ट वाढताहेत आणि म्हणून लोक पॉझिटिव्ह येताहेत हे खरं आहे

आता पॉझिटिव्हिटी रेट कमी होताना दिसतोय?

“आता राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. फेब्रुवारीमध्ये राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला होता त्या अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्येचा ग्राफ उतरता दिसतोय. त्यानंतर पुणे, औरंगाबादमध्ये उशीराने कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली ज्यामुळे त्यांचा रुग्णसंख्येचा ग्राफ आणखी काही दिवासांनी कमी होताना दिसेल.” अशी माहिती डॉ. आवटे यांनी दिली.

व्हॅक्सिनेशनने रुग्णसंख्या कमी व्हायला मदत होईल?

“आपली अपेक्षा आहे की व्हॅक्सिनेशनमुळे रुग्णसंख्या कमी होईल अशी. पण, ते व्हॅक्सिनेशनच्या परीमाणकारकतेवर अवलंबून आहे. ते आता येत्या काही दिवसांत आपल्या लक्षात येईल” अपेक्षा करतोय की तो परीणाम दिसावा. डॉ. आवटे सांगतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT