बार्ज P 305 Accident : कंपनीला कामावर असणाऱ्या लोकांच्या जिवाची किंमत नाही, बेपत्ता कर्मचाऱ्याच्या भावाचा आरोप
तौकताई चक्रीवादळाचा फटका इतर राज्यांप्रमाणे मुंबईलाही बसला. अरबी समुद्रात बार्ज P 305 हे जहाज बुडून ३७ जणांचा मृत्यू झाला. वादळात अडकलेल्या या जहाजातील खलाशी आणि प्रवाशांना नौदलाच्या जवानांनी रेस्क्यु ऑपरेशनकरुन वाचवलं. अद्यापही या बोटीवरील काही लोकं बेपत्ताच आहेत. जहाजावर काम करणाऱ्या अर्जुन एम.टी. हा देखील अजुन बेपत्ता असून त्याचा परिवार त्याची वाट पाहतो आहे. गेल्या […]
ADVERTISEMENT
तौकताई चक्रीवादळाचा फटका इतर राज्यांप्रमाणे मुंबईलाही बसला. अरबी समुद्रात बार्ज P 305 हे जहाज बुडून ३७ जणांचा मृत्यू झाला. वादळात अडकलेल्या या जहाजातील खलाशी आणि प्रवाशांना नौदलाच्या जवानांनी रेस्क्यु ऑपरेशनकरुन वाचवलं. अद्यापही या बोटीवरील काही लोकं बेपत्ताच आहेत. जहाजावर काम करणाऱ्या अर्जुन एम.टी. हा देखील अजुन बेपत्ता असून त्याचा परिवार त्याची वाट पाहतो आहे.
ADVERTISEMENT
गेल्या १५ वर्षांपासून अर्जुन या क्षेत्रात काम करत आहे. तीन आठवड्यांपूर्वीच अर्जुन मुंबईसाठी रवाना झाला होता. अर्जुनची पत्नी ही सीआरपीएफमध्ये कार्यरत आहे. “अर्जुन आणि त्याच्या पत्नीचं रविवारी शेवटचं बोलणं झालं, त्यानंतर आमचा त्याच्याशी संपर्क नाही. आम्ही खूप आतुरतेने त्याच्याविषयी काही माहिती मिळते का याची वाट पाहतोय. दोन हेल्पलाईनचे नंबर दिले आहेत, पण मी आतापर्यंत त्यावर हजारवेळा तरी प्रयत्न केला असेल पण तिकडूनही काहीच माहिती मिळाली नाही.” अर्जुनच्या भावाने मुंबई तक शी बोलताना माहिती दिली.
आम्ही खूप चिंतेत आहोत. संपूर्ण परिवाराला मोठा धक्का बसला आहे. अर्जुनचे वडील आजारी आहेत. कोणत्याही सरकारी एजन्सीकडून किंवा कंपनीकडून आम्हाला माहिती मिळत नाहीये. कृपा करुन कोणीतरी आम्हाला आमच्या भावाविषयी माहिती द्या…बेपत्ता असलेल्या अर्जुनविषयी बोलत असताना भाऊ अनिष भावुक झाला होता.
हे वाचलं का?
यावेळी बोलत असताना अर्जुनच्या भावाने कंपनीवरही निष्काळजीपणाचा आरोप केला. “कामावर असणाऱ्या लोकांच्या जीवाची अजिबात किंमत नाहीये. जेव्हा सर्व देशाला माहिती होतं की वादळ येणार आहे तरीही कंपनीने बार्ज P 305 समुद्रात का घातलं? या अपघातात कंपनीकडूनही निष्काळजीपणा झाला आहे.”
Afcons इन्फ्रास्ट्रक्चरने सांगितलं P 305 बार्जचा अपघात नेमका कसा झाला?
ADVERTISEMENT
कोणत्या बार्ज वर किती कर्मचारी होते?
ADVERTISEMENT
P 305 या बार्जवर एकूण 261 जण होते त्यापैकी 13 कर्मचारी हे Afcons होते
SS3 या बार्जवर एकूण 202 जण होते आणि त्यापैकी 8 जण Afcons चे कर्मचारी होते
Gal Constructor या बार्जवर 137 जण होते आणि त्यापैकी 8 जण Afcons चे कर्मचारी होते
Trintiy Nissie या बार्जवर 268 जण होते त्यापैकी 7 जण Afcons चे कर्मचारी होते
Falcon Warrior या बार्जवर 203 जण होते त्यापैकी 6 Afcons चे कर्मचारी होते
Ocean 303 या बार्जवर 170 जण होते त्यापैकी 8 Afcons चे कर्मचारी होते
शोध मोहीम अजूनही सुरू
19 तारखेच्या दुपारी P 305 या बार्ज दुर्घटनतेल्या 186 जणांना वाचवण्यात आलं आहे. या बार्जवर 261 जण होते. अद्यापही सर्च ऑपरेशन म्हणजेच शोध मोहीम सुरू आहे. आम्ही ONGC, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या संपर्कात आहोत. त्यांच्या माध्यमातून हरवलेल्यांचा शोध आम्ही घेत आहोत.
Tauktae Cyclone : नौदलाच्या रुपात जेव्हा देवच समोर येतो
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT