चिडवलं म्हणून 5 वर्षाच्या मुलाची हत्या; 11वीतल्या विद्यार्थ्याचं रागाच्या भरात कृत्य
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील 5 वर्षीय बालकांच्या खुनाचे रहस्य अवघ्या काही तासात उलगडण्यात उस्मानाबाद पोलिसांना यश आले आहे. चिडवल्याने राग आल्याने गावातील एका अल्पवयीन मुलाने दोरीने गळा आवळून खून केला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपीने इंटरनेटवर अल्पवयीन आरोपीला 302 कलम अंतर्गत किती शिक्षा होते यासह कायदेशीर प्रक्रियेची माहिती […]
ADVERTISEMENT
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील 5 वर्षीय बालकांच्या खुनाचे रहस्य अवघ्या काही तासात उलगडण्यात उस्मानाबाद पोलिसांना यश आले आहे.
ADVERTISEMENT
चिडवल्याने राग आल्याने गावातील एका अल्पवयीन मुलाने दोरीने गळा आवळून खून केला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपीने इंटरनेटवर अल्पवयीन आरोपीला 302 कलम अंतर्गत किती शिक्षा होते यासह कायदेशीर प्रक्रियेची माहिती घेल्याचे समोर आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, आजीनाथ काशीद यांच्या पथकाने ही कामगिरी केली. गावात 11 वी सायन्स शाखेत एक मुलगा शिकत होता त्याच्या घरापासून जवळ मयत 5 वर्षचा मुलगा राहत होता.
हे वाचलं का?
या आरोपीला गावात कंट्या म्हणून चिडवत होते. त्यामुळे मयत ओम बागल या मुलाने त्याला कंट्या अशी हाक मारली. चिडवल्याने त्याने ओमच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तो बेशुद्ध झाला व त्यानंतर त्याला घरात नेऊन नायलॉन दोरीने गळा आवळला आणि त्याच्या कानातली बाली काढून स्वतःच्या बूट मध्ये लपवली.
त्यानंतर त्या मृतदेहवर गादी इतर सामान टाकून तो शेजारी राहत असलेल्या चुलत्याच्या घरात नेहून टाकला. रात्रभर या मुलाने इंटरनेटवर खून केल्यावर काय शिक्षा होते यासह क्राईम पेट्रोल पाहून हा खून केला. त्यानंतर आरोपीने स्वतः सकाळी वडिलांना दारात हात दिसले असे सांगितले. या आरोपी मुलाला क्राईम पेट्रोल पाहण्याची सवय होती, असंही पोलीस तपासातून समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT