Kalyan : आईकडून २०० रुपये घेऊन पेट्रोल भरण्यासाठी बाहेर पडला तरुण, ओव्हरटेक करण्याच्या नादात गमावला जीव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कल्याण पूर्व परिसरात इतर गाड्यांना ओव्हरटेक करण्याच्या नादात एका बाईकस्वार तरुणाचा रस्ते अपघातात जीव गेला आहे. कल्याण पुर्व भागातील तीसगाव नाका परिसरातील पुणे लिंक रोडवर हा अपघात घडला. मानधाता मिश्रा असं या मृत बाईकस्वाराचं नाव असून शुक्रवारी दुपारी अडीच वाजल्याच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण पेट्रोल भरण्यासाठी घरातून आईकडून २०० रुपये घेऊन निघाला होता. कल्याण पूर्व परिसरातून तो उल्हासनगरच्या दिशेने जात होता. यावेळी रस्त्यातील इतर गाड्यांना ओव्हरटेक करुन तो पुढे जात होता. तीसगाव नाका परिसरात मानधाताने रिक्षा आणि ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याची बाईक घसरली ज्यामुळे पाठीमागून येणाऱ्या ट्रकखाली येऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अनेक तरुण सध्या ओव्हरटेक करण्याच्या नादात कशीही बाईक चालवत असतात, ज्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढतं. मानधाता हा डोंबिवली पश्चिम परिसरात राहणारा असून त्याला दोन मुलं, पत्नी आणि आई असा परिवार आहे. तो रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीत मार्केटींग विभागात कामाला होता. आईकडून पेट्रोलसाठी २०० रुपये घेऊन मी दुपारी जेवायला घरी येणार आहे असं सांगत तो घरातून बाहेर पडला होता. परंतू मानधाताचा मृतदेहच घरी आहे. पोलिसांनी या प्रकरणात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT