शिंदे गटाच्या युवा सेनेतही ‘घराणेशाही’; कार्यकारिणीत आमदार-नेत्यांच्या पुत्रांचीच वर्णी

मुंबई तक

एकनाथ शिंदेंनी बंडानंतर थेट शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीलाच हात घातला. मोठ्या गटाच्या पाठिंब्यावर शिंदेंनी स्वतःला मुख्य नेता म्हणून जाहीर केलं. त्यानंतर शिंदे गटाची नजर वळलीये ती, शिवसेनेशी सलग्नित युवा सेनेकडे! युवा सेना ताब्यात घेण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू झाले असून, आता युवा सेना कार्यकारिणी सदस्यांची घोषणा करण्यात आलीये. पण ठाकरेंच्या काळात असलेली घराणेशाही शिंदे गटाकडून कायम […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकनाथ शिंदेंनी बंडानंतर थेट शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीलाच हात घातला. मोठ्या गटाच्या पाठिंब्यावर शिंदेंनी स्वतःला मुख्य नेता म्हणून जाहीर केलं. त्यानंतर शिंदे गटाची नजर वळलीये ती, शिवसेनेशी सलग्नित युवा सेनेकडे! युवा सेना ताब्यात घेण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू झाले असून, आता युवा सेना कार्यकारिणी सदस्यांची घोषणा करण्यात आलीये. पण ठाकरेंच्या काळात असलेली घराणेशाही शिंदे गटाकडून कायम ठेवली गेल्याचंच दिसतंय.

खरी शिवसेना कुणाची हा वाद आता सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचलाय. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेबरोबरच युवा सेनेवर कब्जा मिळवण्यासाठी नवा डाव टाकलाय. शिवसेना पक्षावर हक्क सांगितल्यावर शिंदेंनी त्यांचा मोर्चा वळवला आहे तो शिवसेनेच्या इतर संघटनांवर… यातली सगळ्यात महत्वाची संघटना आहे ती युवासेना!

आदित्य ठाकरे प्रमुख असलेल्या युवा सेना स्वतःकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केलं. भाजपसोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर युवा सेनेतही बंडाचे पडसाद उमटले. युवा सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंना पाठिंबा जाहीर केला.

एकनाथ शिंदेंसोबत वाद झाल्याची बातमी पेरली गेली?; प्रताप सरनाईकांचं रोखठोक उत्तर

हे वाचलं का?

    follow whatsapp