आता अमेरिकेत झळकलीय शेतकरी आंदोलनाची जाहिरात - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / आता अमेरिकेत झळकलीय शेतकरी आंदोलनाची जाहिरात
बातम्या

आता अमेरिकेत झळकलीय शेतकरी आंदोलनाची जाहिरात

पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबादर्शवल्यानंतर आता परदेशातल्या अनेक सेलिब्रिटिज शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्या आहेत. अमेरिकेतल्या सिटी ऑफ फ्रेस्नोच्या मेयरनेही या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेची सर्वात मोठी फुटबॉल लीग मानल्या जाणा-या ‘सुपर बाउल फुटबॉल लीग’मध्ये भारतातल्या शेतकरी आंदोलनाची जाहिरात झळकलीय.

सुपर बाउल फुटबॉल लीगही अमेरिकेतली सर्वात मोठी नॅशनल फुटबॉल लीग आहे. 60 च्या दशकात ती ‘सुपर बाउल’ या नावाने ओळखली जाऊ लागली. सुपर बाउलचा प्लॅटफॉर्म जाहिरातींसाठी महत्त्वाचा मानला जातो कारण तिथे दरवर्षी जगातल्या काही सर्वात प्रसिद्ध जाहिराती लॉन्च केल्या जातात. मात्र या वर्षी तिथे इतर काही जाहिरातींबरोबरच भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची जाहिरातही दाखवली गेली. ‘मानवी इतिहासातलं सर्वात मोठं आंदोलन’, असा उल्लेख या आंदोलनाचा या जाहिरातीत करण्यात आला आहे.

टम्पा बे बुकेनेर्स आणि कंसास सिटी चीफ्स यांच्यातला सामना सुरू असताना ही 30 सेकंदाची जाहिरात चालली. जाहिरातीची सुरूवात मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअरच्या एका क्वोटने होते आणि भारतात सध्या सुरू असलेलं शेतकरी आंदोलन हे, ‘मानवी इतिहासातलं सर्वात मोठं आंदोलन’ असल्याचा उल्लेख त्यात येतो.

अमेरिकेत या सुपर बाउलमध्ये झळकणा-या जाहिरातींना वेगळं महत्त्व आहे कारण त्या बरेचदा स्पेशली सुपर बाउलमध्ये दाखवण्यासाठी तयार केल्या जातात. त्यात वापरलेलं कॅमेरा तंत्र, सिनेमॅटोग्राफी सगळ्याच बाबतीत त्या खूप उजव्या असतात असं मानलं जातं. आता राउटर्सच्या रिपोर्टनुसार टम्पा बे बुकेनेर्स आणि कंसास सिटी चीफ्स यांच्यातल्या ज्या सामन्यात ही जाहिरात झळकली तो सामना 10 कोटी लोकांनी पाहिला असल्याचा अंदाज आहे.

सुपर बाउलचा इतिहास पाहिला तर सुपर बाउलच्या मॅचेस या अमेरिकन टेलिव्हिजवर सर्वाधिक पाहिल्या जाणा-यांपैकी एक आहेत. 2015 साली तर फक्त अमेरिकेतल्या तब्बल 11 कोटी 44 लाख जनतेनं सुपर बाउल पाहिल्याचं सांगितलं जातं, त्यामुळे अशा स्पर्धेत जेव्हा एखादी जाहिरात दाखवली जाते, तेव्हा तिच्यावर झालेला खर्चही जास्त असतो. सुपर बाउल अँड.कॉमवरच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी सुपर बाउलमधल्या जाहिरातीची किंमत प्रत्येकी अंदाजे 55 लाख इतकी होती. शेतकरी आंदोलनाबरोबरच इथे अमेझॉन, चिपोटले, उबर इट्स यांच्याही जाहिराती झळकल्या.

आता प्रश्न असा निर्माण होतो की, मग अमेरिकेत झळकलेल्या जाहिरातीसाठीचा खर्च कोणी उचलला असेल? तर हा खर्च सेंट्रल व्हॅलीतल्या शीख कम्युनिटीकडून उचलला गेल्याची शक्यता व्यक्ती केली जातेय. शेतकरी आंदोलनाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी या निर्णय घेतला अशी शक्यता वर्तवली जातेय. अमेरिकेल्या सेंट्रल व्हॅलीमध्ये शीखांची संख्या जास्त आहे. त्यांच्या व्यतिरिक्त आता कॅनेडियन पंजाबी गायक जॅझी बी नेही आपलं समर्थन दर्शवलं आहे.

शिवाय अमेरिकेचा फुटबॉल प्लेयर जुजू स्मिथ-शूस्टर यानेही या आंदोलनासाठी आपलं समर्थन दर्शवलं आहे. काइल कुज़्मा, बॅरन डेविस या बास्केटबॉल प्लेयरने, अभिनेता जॉन कुसॅक, कॉमेडियन हसन मिन्हाज या सगळ्या अमेरिकेल्या सेलिब्रिटिजनेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता यामुळे या आंदोलनाला वेगळं वळण लागतं का?, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

हा व्हिडिओ देखील पहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 5 =

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!