Mohan Delkar Case : सुप्रिया सुळेंनी ओम बिर्लांकडे केली ही मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातलं एक निवेदनही त्यांनी ओम बिर्ला यांना दिलं.

सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं आहे निवेदनात?

आपल्याला माहित आहेच की खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि तेवढीच धक्कादायकही आहे. सातवेळा खासदारकी भुषवणारे मोहन डेलकर इतके निराश झाले होते, वैफल्यग्रस्त झाले होते की त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. आपण आपल्या सहकाऱ्याला गमावलं आहे. तुम्ही लोकसभेचे प्रमुख आहात. त्या नात्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जावी अशी मागणी मी आपल्याकडे या पत्राद्वारे करते आहे. तसंच भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी योग्य ते उपाय योजण्याची गरज आहे असंही सुप्रिया सुळे यांनी या पत्रात सुचवलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण?

दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह २२ फेब्रुवारीला मुंबईतल्या हॉटेलमध्ये आढळला. त्यांनी आत्महत्या केली असून त्यांची सुसाईड नोटही आढळून आली. मोहन डेलकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दिली. मोहन डेलकर सातवेळा खासदार राहिले आहेत. ५८ वर्षीय मोहन डेलकर दादरा नगर हवेलीचे खासदार होते. १९८९ मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. सलग सहावेळा त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली होती. २०१९ ला ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT