सामना अग्रलेख : PM नरेंद्र मोदींचे मन अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप - Mumbai Tak - uddhav thackeray saamana editorial pm narendra modi is like small child - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

सामना अग्रलेख : PM नरेंद्र मोदींचे मन अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप

मुंबई : “देशात भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील कारवायांमुळे राजकारणात नवे ध्रुवीकरण सुरू झाले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना वाचविण्यासाठी काही राजकीय गट संघटित होत आहेत. त्यांच्यापासून देशातील आणि केरळच्या जनतेला सतत सावध राहावे लागेल.” असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यावर असताना केले होते. त्यांच्या याच विधानावर आता “नरेंद्र मोदींचे मन अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप […]

मुंबई : “देशात भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील कारवायांमुळे राजकारणात नवे ध्रुवीकरण सुरू झाले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना वाचविण्यासाठी काही राजकीय गट संघटित होत आहेत. त्यांच्यापासून देशातील आणि केरळच्या जनतेला सतत सावध राहावे लागेल.” असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यावर असताना केले होते. त्यांच्या याच विधानावर आता “नरेंद्र मोदींचे मन अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप आहे” असे म्हणतं शिवसेनेकडून हल्लाबोल करण्यात आला आहे.

काय म्हटले आहे सामनामध्ये?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप आहे. बालकाच्या हाती एखादे खेळणे वगैरे दिल्यावर ते आपल्याच धुंदीत, मजेत खेळत बसते. आजूबाजूला काय चालले आहे याच्याशी त्या बालकास घेणे-देणे नसते. आपले पंतप्रधान तसेच आहेत. पण मोदी यांचे विधान गांभीर्याने घ्यावे की एका निरागस बालकाचे बोल म्हणून सोडून द्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न.

नितीश कुमारांच्या बंडामुळे पंतप्रधान मोदींच्या मनात खळबळ

पण एक मात्र नक्की, बिहारमधून नितीश कुमारांनी बंड करून आव्हान देताच मोदी यांच्या मनात खळबळ माजलेली दिसते. नितीश कुमार हे मोदी यांना पर्याय ठरू शकतील की नाही हे अद्याप ठरायचे आहे, पण त्यांनी बिहारातून रणशिंग फुंकले आहे, हा संदेश सर्वदूर पोहोचला आहे. मोदी यांनी आता भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला आहे. ते म्हणतात की, “नितीश, शरद पवार, ममता, शिवसेना, तेलंगणाचे के. सी. राव वगैरे एकत्र येत आहेत ते भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी! ही भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ राजकीय गटबाजी आहे.

सुवेंदु अधिकारी, शिंदे गट, भावना गवळी, लालू प्रसाद यादव

सामना अग्रलेखातुन सुवेंदु अधिकारी, शिंदे गट, भावना गवळी यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांना आव्हान देण्यास भारतीय जनता पक्षाने तृणमूलचेच सुवेंदु अधिकारी यांना भाजपात आणले. आता ते भाजपकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. पण हे सुवेंदु कोण? तर हे सुवेंदु म्हणजे ‘शारदा चीट फंड’ घोटाळ्यातील ‘मास्टर माईंड’ आहेत व त्यांची जागा तुरुंगात आहे. अशा गर्जना कालपर्यंत भाजप करीत होता. हे निरागस मोदींना कोणी माहित करून दिले नाही काय? असा सवाल विचारण्यात आला आहे.

महाराष्ट्रात तर भ्रष्ट मंडळींना बाजूला घेऊन त्यांनी एक गट केला. पण स्वतः शिंदे व त्यांच्या लोकांवर ईडी चौकशीचे जोखड होते. त्यांच्या बरोबरच्या किमान दहा आमदारांची ईडी चौकशी सुरू होती. म्हणजे भ्रष्टाचार होताच. काहींनी अटकपूर्व जामीन घेतले. या सगळ्यांचा एक राजकीय गट करून त्यांच्या बरोबर भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले.

खासदार भावना गवळी यांना तुरुंगात टाकण्याची भाषा भाजपचे लोक करीत होते, पण भावनाताईंकडून मोदी यांनी प्रेमाने राखी बांधून घेतल्याने ताईंवरचे सगळे आरोप ‘स्वच्छ’ झाले. संजय राठोड या मंत्र्याची एक ‘क्लिप’ आजही पुण्याच्या पह्रेन्सिक लॅबमध्ये आहे, असेही अग्रलेखामध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three + five =

‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी!