केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह

खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोनाचा संसर्ग
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह

प्रविण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याचप्रमाणे खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोना झाला आहे. मागच्या आठवड्यात अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोना झाला आहे. सरकारमधले मंत्री, विरोधी पक्षातले नेते असे सगळेच कोरोनाने ग्रासले आहेत. त्यात आता भारती पवार यांच्या नावाचीही भर पडली आहे. भारती पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात ठिकठिकाणी दौरे केले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या. भारती पवार यांनी ट्विटरवरून आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे.

काय म्हटलं आहे भारती पवार यांनी?

आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतः घरीच क्वारंटाईन झाले आहे. ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या होत्या त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन मी करते आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं आणि मास्क लावावा असं आवाहन भारती पवार यांनी केलं आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्र सरकारने संथ गतीने काम करणं सोडावं, कोरोना परिस्थितीवरून भारती पवार यांची टीका

शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोना झाला आहे. त्यांनीही यासंदर्भातली माहिती ट्विट करून दिली असून सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्रातल्या कोणत्या राजकीय व्यक्तींना कोरोना?

महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला. त्यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरवर दिली होती.

महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही कोरोनाने गाठलं. त्यांना कोणतीही लक्षणं नाहीतर मात्र कोरोना झाला आहे ही माहिती त्यांनीच दिली.

महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पडवी यांनाही कोरोना झाला आहे

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला त्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनाही काही दिवसांपूर्वी कोरोना झाला ज्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली.

रोहित पवार यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रात्री उशिरा त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. अजित पवारांनी त्यांना जामखेड येथे झालेल्या भाषणात मास्क न लावण्यावरून झापलं होतं.

पंकजा मुंडे यांनाही पुन्हा एकदा कोरोना झाला आहे याची माहिती त्यांनी दिली.

भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कोरोना झाला आणि त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली होती. ते एका लग्नात सहभागी झाले होते तिथे त्यांनी मास्क लावला नव्हता त्याचप्रमाणे अधिवेशनातही त्यांनी मास्क लावला नव्हता.

इंद्रनील नाईक, चंद्रकांत निंबा पाटील, समीर मेघे, माधुरी मिसाळ या आमदारांनाही कोरोना झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोरोना झाला तसंच त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोना झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in