Andheri by poll : भाजपचे मुरजी पटेल शिंदे गटाकडून लढवणार पोटनिवडणूक?

मुंबई तक

ADVERTISEMENT

अंधेरीची पूर्व मतदारसंघाची निवडणूक होतेय. शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. त्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. या निवडणुकीचे निकाल ठाकरे आणि शिंदे महत्त्वासाठी आहे. तर दुसरीकडे भाजपचंही या पोटनिवडणुकीवर विशेष लक्ष आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे राहिलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून शिंदे गट उमेदवार देणं अपेक्षित […]

social share
google news

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे राहिलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून शिंदे गट उमेदवार देणं अपेक्षित होतं. मात्र भाजपनं आपला उमेदवार उतरवण्याची तयारी केलीये. असं असलं तरी भाजपनं अनिश्चितता कायम ठेवलेली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

भाजपकडून मुरजी पटेल हे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक लढवतील, हे निश्तिच मानलं जात असलं, तरी भाजपनं तशी अधिकृत घोषणा केलेली नाही आणि यामुळेच भाजप अखेरच्या क्षणी रणनीती बदलणार का? असा प्रश्नही पुढे आलाय.

भाजपनं मुरजी पटेल यांचं नाव जाहीर केलं नसलं, तरी मुरजी पटेल हे गुरुवारी (१३ ऑक्टोबर) भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. तशी माहितीही देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी अर्ज दाखल करणं रद्द केलं. आता ते शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र, मुरजी पटेलांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात झालेल्या बदलामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू झालीये.

हे वाचलं का?

भाजपचे मुरजी पटेल शिंदे गटाकडून पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे शिवसेनेकडे असलेला मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गट उमेदवार का देत नाही, असा प्रश्न निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित झालाय. निवडणुकीच्या प्रचारातही या मुद्द्यावरून शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

हे टाळण्यासाठी आता भाजप आणि शिंदे गटाकडून वेगवेगळ्या पर्यांयाची चाचपणी सुरू आहे. त्यात एक शक्यता अशीही बोलली जातेय की, मुरजी पटेलांनी अंधेरीतून निवडणूक लढवण्याची तयारी केलीये आणि त्यांना भाजपच्या तिकीटाऐवजी शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र याबद्दल शिंदे गटाकडून कोणतंही विधान केलं गेलेलं नाही.

अंधेरी पोटनिवडणूकीबद्दल ठाकरे, भाजप आणि शिंदे गटाची काय आहे रणनीती? समजून घेण्यासाठी व्हिडीओ बघा

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT