बाळासाहेबांना ‘भारतरत्न’ पुरस्कार का मिळाला पाहिजे, प्रवीण तोगडिया म्हणतात…
विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडियांनी बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, महंत अवैद्यनाथ आणि रामचंद्र परमहंस यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे देशात अजून रामराज्य आलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशातील हिंदूंना जोपर्यंत हक्काची घरे मिळणार नाहीत, तोपर्यंत रामराज्य येणार नाही, असंही मत त्यांनी पत्रकार परिषदेमार्फत मांडलं आहे. शौर्य दिनानिमित्त नागूपरमध्ये ते बोलत होते.

ADVERTISEMENT
mumbaitak