देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती आहे तरी किती? पत्नी आणि मुलीच्या नावावर...
देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती आणि गुंतवणूक याबाबत माहिती मिळते. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ५६ लाख रुपये मूल्याची संपत्ती आहे, तर अमृता फडणवीस यांच्याकडे ६ कोटी ९६ लाख रुपये मूल्याची संपत्ती आहे. त्यांच्या संपूर्ण वित्तीय स्वरूपाचे विस्तृत विश्लेषण येथे दिले आहे.

ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ ५६ लाख ७ हजार ८६७ रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद आहे. अमृता फडणवीस यांच्याकडे मात्र ६ कोटी ९६ लाख ९२ हजार ७४८ रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या मुलगी दिवीजा हिच्या नावावर १० लाख २२ हजार ११३ रुपयांची संपत्ती नमूद केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २३ हजार ५०० रुपये आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे १० हजारांची रोकड असल्याचे नमूद केले आहे. देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांनी विविध बँक खात्यात अनुक्रमे २ लाख २८ हजार ७६० आणि १ लाख ४३ हजार ७१७ रुपये ठेवले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी विमा पॉलिसी आणि वित्तीय साधनांमध्ये २० लाख ७० हजार ६०७ रुपये गुंतवले आहेत, तर अमृता फडणवीस यांनी ५ कोटी ६२ लाख ५९ हजार ३१ रुपयांची गुंतवणूक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ३२ लाख ८५ हजार रुपये मूल्याचे ४५० ग्रॅम सोने आहे, तर अमृता फडणवीस यांच्याकडे ६५ लाख ७० हजार रुपये मूल्याचे ९०० ग्रॅम सोने आहे.