धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलांची मध्यरात्री घेतली भेट! कारण...

मुंबई तक

धनंजय मुंडेंनी काल मध्यरात्री मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची अचानक भेट घेतल्यामुळे चर्चा रंगलीय.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या कालच्या भेटीनं राज्यभरात खळबळ उडालीय. धनंजय मुंडेंनी काल मध्यरात्री मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतल्यानं चर्चा रंगलीय. कुणालाही कानो कान खबर न लागू देता घेतलेल्या धनंजय मुंडे अचानकपणे अंतरवाली सराटीत दाखल झाले. धनंजय मुंडे येताच झोपलेले मनोज जरांगे पाटील जागे झाले आणि त्यानंतर जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, आरक्षणाच्या विषयावर आमची चर्चा झाली असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. तर दुसरीकडे कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी आपण जरांगे पाटलांना भेटलोच नाही असं सांगितलंय. भेटीच्या बातमी मागची बातमी पाहुयात या रिपोर्टमधून.

    follow whatsapp