Raigad: मुसळधार पावसामुळं पूरस्थिती, नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे, परिणामी रायगडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत आणि आवश्यक उपाययोजना त्वरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे, परिणामी रायगडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत आणि आवश्यक उपाययोजना त्वरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रोहा तालुक्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळं शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं अनेक घरं, सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. परिणामी रोह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित करण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि बचाव पथकांना कार्यरत करण्यात आले आहे. या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत रस्ते आणि वाहतूक व्यवस्था ठप्प आहेत. नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये अशी सूचना देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील काही घरांच्या संरचना धोकादायक स्थितीत आल्या आहेत आणि त्यामुळे प्रशासनाने तातडीने मदतकार्य चालू केले आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोकणातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या या परस्थितीवर प्रशासनाने लक्ष ठेवले आहे आणि पूरग्रस्तांना मदतकार्य सुरूच ठेवले आहे.