खरी शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? केंद्रीय निवडणूक आयोग कसं ठरवणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आज महत्त्वाचा निर्णय आला. शिंदे गटाकडून शिवसेनेवरच ताबा घेण्याचे प्रयत्न सुरू केले असून, आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हासंदर्भातल्या मुद्द्यावरील प्रक्रिया करण्यास परवानगी दिली. त्यामुळे आता सगळं लक्ष शिवसेना कुणाकडे जाणार याकडे लागलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील मुद्द्यावरील […]

social share
google news

बहुमतांचा निकष पूर्ण करण्यासाठी शिंदे-ठाकरेंची जुळवाजुळव

शिंदेंनी निवडणूक आयोगात धाव घेण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी आयोगाला पत्र दिलेलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी पत्र दिल्यानंतर निवडणूक आयोगानं शिंदे गटासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बाजू मांडण्यास सांगितलं होतं. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी शपथपत्र लिहून घेण्याचा कार्यक्रम रावबला. दुसरीकडे इतर राज्यातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न दोघांकडूनही केले जात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यासाठी इतर राज्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यातून ठाकरेंनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. तसाच प्रयत्न एकनाथ शिंदेनींही काही दिवसांपूर्वी केला. मध्य प्रदेश, छत्तीसगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, तामीळनाडू, पुड्डुचेरी, मणिपूर, राजस्थान, आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, हरियाणा, केरळ अशा राज्यातील शिवसेनेच्या राज्यप्रमुखांना दिल्लीत बोलावून शिंदेंनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT