अदर पूनावालांची आणखी एका लसीबाबत घोषणा, जूनपर्यंत येणार नवी लस? - Mumbai Tak - we have also applied to start trials in india hope to launch covovax by june 2021 says adar poonawla - MumbaiTAK
बातम्या

अदर पूनावालांची आणखी एका लसीबाबत घोषणा, जूनपर्यंत येणार नवी लस?

सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ यांनी आज एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सीरम इन्स्टिट्युट आणि नोव्हाव्हॅक्स यांच्या भागीदारीत होत असणाऱ्या लसीच्या चाचण्यांसाठी अर्ज केला आहे. कोव्होव्हॅक्स असं या लसीचं नाव असणार आहे ही लस जूनपर्यंत येऊ शकेल अशी आशाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे. याआधी कोव्हिशिल्ड ही लस सीरमने तयार केली. या लसीच्या चाचण्या […]

सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ यांनी आज एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सीरम इन्स्टिट्युट आणि नोव्हाव्हॅक्स यांच्या भागीदारीत होत असणाऱ्या लसीच्या चाचण्यांसाठी अर्ज केला आहे. कोव्होव्हॅक्स असं या लसीचं नाव असणार आहे ही लस जूनपर्यंत येऊ शकेल अशी आशाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे. याआधी कोव्हिशिल्ड ही लस सीरमने तयार केली. या लसीच्या चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या. तसंच ही लस अनेकांना लसीकरण मोहिमेदरम्यान देण्यातही आली. आता कोव्हाव्हॅक्स या नव्या लसीच्या चाचण्यांसाठी अदर पूनावाला यांनी अर्ज केला आहे. तसंच ही नवी लस जून 2021 पर्यंत येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा कहर होता. अशा वेळी कोरोनावर लस शोधण्याचं काम भारतीय कंपन्या करत आहेत. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्युट यांनी पुढाकार घेऊन कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या दोन लसी आणल्या सीरमने आणली ती कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकने आणली ती कोव्हॅक्सिन. या दोन्ही लसी भारतीयांना लसीकरण मोहिमेच्या वेळी देण्यात आल्या. आता सीरम इन्स्टिट्युने कोरोनाचा प्रतिबंध करणारी तिसरी लस आणायचं ठरवलं आहे.

नोव्हाव्हॅक्स ही अमेरिकेतील लस तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीने सीरमसोबत करार केला आहे. नोव्हाव्हॅक्स आणि सीरम यांच्यात गेल्या वर्षी 30 जुलैला हा करार झाला आहे. नोव्हाव्हॅक्सच्या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यातली चाचणी सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडली आहे. मात्र आता भारतात या लसीच्या चाचण्या करण्याची परवानगी सीरम इन्स्टिट्युटने मागितली आहे. या लसीचं वैशिष्ट्य हे आहे की लस कोरोना व्हायरस आण त्याच्या दोन म्युटेशनवरही प्रभावशाली ठरली आहे. जुन्या कोरोनावर 96 टक्के तर नव्या कोरोनावर 86 टक्के परिणाम दाखवणारी ही लस आहे. आता याच लसीच्या चाचण्या भारतात सुरु करण्यात याव्यात यासाठी अदर पूनावाला यांनी संमती मागितली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 − four =

विस्मरणाचा असेल आजार तर एवढंच करा दुधामध्ये फक्त ‘ही’ चार पानं टाका Tadoba: सगळ्यांसमोर भिडले दोन वाघ, रक्तबंबाळ झाले अन्.. दररोज Squats करा; मिळतील ‘हे’ 7 अप्रतिम फायदे! फिरायचा प्लान करताय? मुंबईपासून काही अंतरावर असलेली ‘ही’ ठिकाणं करा Explore रम आणि ब्रँडीमध्ये ‘हा’ आहे फरक… ‘या’ 5 टेक्निक्सने Hip Fat झटपट करा दूर! Team India सोबत विमानात कोण होती ती ‘मिस्ट्री गर्ल’, पाहा PHOTO सनी देओल दिसला दारूच्या नशेत, व्हिडीओ व्हायरल… ‘Animal’ मध्ये रणबीरसोबत रोमान्स, अभिनेत्रीचा ग्लॅमरस-हॉट लुक पाहिला का? Top 10 बेस्ट केटो डाएट फॉलो करून करा Weight Loss Weight Loss: महिन्याभरातच कसं व्हायचं स्लिम-फिट? दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात? Archies: नातवाचा ग्रँड डेब्यू; धाकट्या भावासोबत पहिल्यांदाच दिसले अमिताभ बच्चन! गाजराचा हलवा बनवताय? मग लक्षात ठेवा ‘या’ छोट्या टिप्स… डॉ. बाबासाहेबांबद्दल 10 खास गोष्टी, तुम्हाला किती माहितीये? तुमचं सौंदर्य चाळीशीतही राहील सुंदर अन् निरागस; फक्त ‘या’ 3 गोष्टी नेहमी करा फॉलो! Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात