शेतकरी थंडीत मरत होता तेव्हा बॉलिवूडचे कलाकार कुठे होते?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्लीत केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी बॉलिवूड सेलिब्रेटींना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेट्रोलच्या वाढत्या किमतींवरुन बॉलिवूड सेलिब्रेंटीनी साधलेल्या मौनावर बोट ठेवत यापुढे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना महाराष्ट्रात शुटींग करु देणार नाही असा पवित्रा घेतला. यावर प्रतिक्रीया विचारली असता अरविंद सावंत यांनी, दिल्लीत शेतकरी थंडीत मरत होता तेव्हा बॉलिवूड सेलिब्रेटी कुठे होते असा प्रश्न विचारला आहे.

“नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी जे काही वक्तव्य केलंय त्यावर मी बोलणार नाही. मी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल बोलेन. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या थंडीत आंदोलन करताना मरत आहेत, तेव्हा हे बॉलिवूड सेलिब्रेटी कुठे होते? शांतपणे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकारने कशी वागणूक दिली हे आपण सर्वांनी पाहिलं. दिल्लीत केंद्र सरकारने भारत-पाक युद्धासारखी परिस्थिती निर्माण करुन ठेवली. त्यावेळी हे बॉलिवूड सेलिब्रेटी पुढे का आले नाहीत?” असं म्हणत अरविंद सावंत यांनी बॉलिवूड सेलिब्रेटींवर टीका केली.

गेल्या १० ते ११ दिवसांपासून देशात पेट्रोलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांना या पेट्रोल दरवाढीची झळ बसत असताना कोणताही सेलिब्रेटी यासाठी पुढे आला नाही. मात्र काँग्रेसच्या काळात पेट्रोलचे दर वाढले की लगेच पुढे येऊन मतं मांडणारे सेलिब्रेटी केंद्र सरकारच्या दबावाखाली असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा नाना पटोलेंच्या हातात आल्यानंतर त्यांनी बॉलिवूड कलाकारांविरोधात आपला मोर्चा वळवत अक्षय आणि अमिताभ बच्चन यांचं महाराष्ट्रात शुटींग होऊ देणार नाही असं म्हटलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT