Mumbai Tak /बातम्या / ‘या’ गावात धुळवड दिवशी जावयाची गाढवावरुन मिरवणूक का काढतात?
बातम्या

‘या’ गावात धुळवड दिवशी जावयाची गाढवावरुन मिरवणूक का काढतात?

son-in-law’s procession on a donkey : जावई म्हटलं की त्याचा खूप मानपान बघितला जातो. जावई (Son Inlaw) घरी येणार म्हटलं की पंचपक्वान्न बनवून त्याला खुश केलं जातं. जावई दुखावणार नाही याची भरपूर काळजी घेतली जाते. जावई रुसला म्हणजे पोरीला नीट नांदवणार नाही, अशी समज सासरकडच्या (Inlaws) लोकांची असते. म्हणून जावयाचे लाड पुरवले जातात. पण एक गाव असं आहे जिथे जावयाला शोधून त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून चक्क त्याची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. (Why is the son-in-law’s procession on a donkey on Dhulivandana day in this village?)

100 वर्ष जुनी परंपरा

100 वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. नेमकी ही प्रथा काय आहे, हेच आपण जाणून घेऊया. बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या विडा गावात दर धुलिवंदनाला जावयाची रंगाची उधळण करून, वाजत गाजत गाढवावरून मिरवणूक काढली जाते. आता धुळवडी दिवशीच ही मिरवणूक का काढली जाते? त्या मागं 100 वर्षांपूर्वीचं इतिहास आहे.

ED: ‘जावयाला तरी त्रास द्यायला नको होता’, खडसे पुन्हा भाजपवर बरसले

इथून पडली प्रथा

सण 1915 साली याठिकाणी निजामाची राजवट होती. त्याकाळी विडा गावात जहागिरी होती. तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे मेहुणे धुलीवंदनाला सासुरवाडीत आले होते. त्यावेळी परंपरेने भांग पिऊन थट्टा मस्करी सुरु झाली. मस्करीतून जावयाची गाढवावर बसवून सवारी काढण्यात आली. आणि बास्स तेंव्हापासून ही परंपरा सुरु झाली. मग ही परंपरा कायम ठेवण्यासाठी धुलीवंदनाच्या दोन दिवस अगोदर जावई शोध समिती नेमतात. एका जावयाला शोधून त्याला धुळवडीपर्यंत निगराणीखाली ठेवतात.

मिरवणूक संपल्यानंतर जावयाला दिला जातो मानपान

धुळवडी दिवशी ग्रामपंचायतीसमोर चपलेचा हार घालून गाढवावरून मिरवणुकीला सुरुवात होते. गावाच्या मुख्य रस्त्यावरून वाजतगाजत मिरवणूक दुपारी मारुतीच्या देवळाजवळ थांबते. तिथे लोकवर्गणीतून जमा केलेल्या पैशातून खरेदी केलेल्या कपड्यांचा आहेर गावातील प्रतिष्ठितांच्या हाताने दिला जातो. सासऱ्याच्या ऐपतीप्रमाणे सोन्याची अंगठी भेट दिली जाते. एकीकडे गाढवावर बसून धिंड काढायची आणि त्यानंतर सोनं, कपडे देऊन मानसन्मान करायचा, असा भन्नाट प्रकार या गावात घडतो. विशेष म्हणजे कसलाही भांडण तंटा न होता ही प्रथा पार पडते. त्यात महत्वाचं म्हणजे सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होऊन ही परंपरा पार पाडतात.

मॅक्सवेल भारताचा जावई, पाहा लग्नाचे अगदी खास फोटो

200 जावई भूमिगत

गाढवाच्या मिरवणुकीपासून वाचण्यासाठी गावातील जावई आठवडाभरापूर्वी गावातून धूम ठोकतात. यंदा गावात स्थायिक असलेले 200 जावई भूमिगत झाल्याची माहिती मिळतेय. आता गायब झालेल्या जावयांना शोधण्यात शोध समितीला यश येतो का हे पहावं लागेल.

बीड : कोरोनामुळे ८० वर्षांची परंपरा खंडीत, जावयाची गाढवावरुन निघणारी मिरवणूक यंदा रद्द

एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार?