मुंबईत लॉकडाऊन होणार का? BMC आयुक्त चहल यांची Exclusive मुलाखत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मुंबईत पुन्हा लॉकडाऊन (Mumbai Lockdown) लागणार का? अशी भीती मुंबईकरांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील नेमके प्रश्न ‘मुंबई तक’ने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Bmc Commissioner Iqbal Singh Chahal) यांना विचारले आहेत. मुंबई तकला दिलेल्या Exclusive मुलाखतीत चहल यांनी स्पष्ट केलं आहे की, लॉकडाऊन लावण्याची शासनाची अजिबात इच्छा नाही.

दुसरी लाट असली तरीही मुख्यमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेचा विचार करता फक्त रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लावली आहे. त्यामुळे हे एक बंधन वगळता सगळे व्यवहार आपल्याकडे सुरु आहेत. लोकल ट्रेन, बसेस देखील सुरु राहणार आहेत. शिवाय लोकांनी कोरोनासंबंधी नियम पाळले तर लॉकडाऊनची वेळ आपल्यावर येणारच नाही’ अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली आहे.

लॉकडाऊनविषयी मुंबईकरांच्या मनातील असणाऱ्या प्रश्नांची नेमकी उत्तरं जाणून घेण्यासाठी आयुक्त इकबाल चहल यांची ही संपूर्ण मुलाखत जशीच्या तशी…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रश्न: मुंबईमध्ये दिवसाला 1 लाख लसीकरणाचं तुमचं टार्गेट होतं ते पूर्ण होतंय का? आणि कोरोनाच्या केसेस वाढत आहेत त्यांच कारण आहे?

आयुक्त इकबाल चहल: एक लाख आपण जे बोलत आहात ते लसीकरणाबाबत आहे त्याविषयी मी नंतर बोलतो. आता आपल्याकडे जी दुसरी लाट आली आहे ती 10 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. जवळपास आता 50 दिवस झाले आहेत. आतापर्यंत म्हणजे काल संध्याकाळपर्यंत आपल्याकडे 91 हजारापर्यंत पॉझिटिव्ह केसेस आल्या आहेत. परंतु यातही एक चांगली बातमी अशी आहे की, या 91 हजारांपैकी 74 हजार रुग्ण हे लक्षण नसलेली (Asymptomatic) आहेत. अशा रुग्णांना कोणत्याही औषधांची गरज नाही, हॉस्पिटलची गरज नाही. फक्त त्यांना होम आयसोलेशनची किंवा विलगीकरणाची गरज आहे.

ADVERTISEMENT

उरलेले जे 17 हजार रुग्ण आहेत त्यांना लक्षणं दिसत आहेत पण ही लक्षणं देखील सौम्य स्वरुपाची आहेत. त्यापैकी 8 हजारांच्या आसपास लोकं हे रुग्ण हॉस्पिटल्समध्ये गेले आहेत. इतर लोकांनी काही हॉस्पिटलची मागणी केलेली नाही. तर आता 91 हजार ज्या केसेस आल्या आहेत त्यापैकी 269 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मृतांची टक्केवारी ही 0.2 टक्के आहे. जी अतिशय कमी आहे.

ADVERTISEMENT

पॉझिटिव्ही रेट नियंत्रणात आहे. आज सकाळी जी आकडेवारी आली त्यानुसार आम्ही 42 हजार टेस्टिंग केली आहे त्यापैकी 5200 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे 14 टक्के पॉझिटिव्ही रेट आहे. सध्या आपल्याकडे 13000 बेड आहेत आणि आणखी 4 हजार बेड आपण वाढवणार आहोत.

राज्यात निर्बंध अधिक कडक करणार, नियोजन सुरू आहे – राजेश टोपे

प्रश्न: कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यावर LOCKDOWN हा एकमेव उपाय आहे का?

आयुक्त इकबाल चहल: कोणतेही साथीचे रोग असो त्यामध्ये तीन केंद्रबिंदू असतात. पहिला म्हणजे आपला मृत्यूदर कमी असला पाहिजे. WHO चं म्हणणं आहे की, मृत्यूदर हा 8 टक्क्यांच्या खाली हवा. आता मागील 50 दिवसात आपण 0.2 एवढा मृत्यूदर ठेवला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना बेडची गरज आहे त्यांना बेड मिळाला पाहिजे. सध्या बेडची जी मागणी आहे त्यापेक्षा आमचा पुरवठा जास्त आहे. बेड भरले तरी आम्ही अधिक बेड वाढवत जाणार. मागच्या वर्षी आपण जे जम्बो हॉस्पिटल सुरु केले त्याचा खूप फायदा होत आहे.

देशात मुंबई हे एकच असं शहर आहे जिथे ९ जम्बो हॉस्पिटल आहेत. हे सगळे हॉस्पिटल आहेत कोव्हिड सेंटर नाहीत. इथे आयसीयू आहेत, डायलिसिस बेड आहेत. 70 टक्के ऑक्सिजन बेड आहेत. म्हणून यामुळे आमची मुंबई आरोग्य सेवा एवढी भक्कम आहे की, दररोज 10 ते 12 हजार कोरोना रुग्ण सापडले तरीही आम्ही परिस्थिती हाताळू शकतो.

तिसरा मुद्दा म्हणजे आपला जो पॉझिटिव्हीटी रेट आहे तो कमी ठेवला पाहिजे. आता जो नवा म्यूटन व्हायरस आहे तो खूपच वेगाने पसरतो. म्हणजे घरात एखाद्या व्यक्तीला त्याची लागण झाली तर घरातील इतर लोकांना देखील लागण होण्याची शक्यता असते. आधी असं होत नव्हतं. त्यामुळे आपला पॉझिटिव्हीटी रेट वाढलाय. पण लक्षणं नसलेले रुग्ण आपल्याकडे अधिक आहेत.

‘…तर लॉकडाऊन लावावाच लागेल’, मुंबई पालिका आयुक्त इकबाल चहल यांचं मोठं वक्तव्य

प्रश्न: पण लॉकडाऊनचं काय, गेल्या वर्षीसारखं लॉकडाऊन लागेल का.. लोकांच्या हिंडण्या-फिरण्यावर बंधनं येतील का, उद्योगधंदे बंद होतील का?

आयुक्त इकबाल चहल: मुख्यमंत्र्यांनी वारंवार ही गोष्ट सांगितली आहे की, शासनाची अजिबात इच्छा नाही लॉकडाऊन करण्याची पण आता लोकांना ठरवायचं आहे. पण लोकं एवढी गर्दी करतायेत. दादर मार्केट पाहा, बीचेस पाहा, मॉल्समध्ये चालण्यासाठी जागा नाहीए. लाखो लोक गर्दी करत आहेत.

आता लोकांना कोरोनाचे नियम पाळले नाही, शिस्त पाळल नाही आणि केसेस वाढत गेले तर नाईलाजाने आपल्याकडे लॉकडाऊनशिवाय कोणताही मार्ग राहणार नाही. त्यामुळे आता लोकांनी ठरवायचं आहे की, त्यांना लॉकडाऊन हवाय की नको. लोकांनी शिस्त पाळली तर लॉकडाऊन करण्याची गरज पडणार नाही.

प्रश्न: लॉकडाऊनचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होतो त्यामुळे तुम्ही हे तरी सांगू शकता का की, गेल्या वर्षीसारखा लॉकडाऊन नसेल, कडक निर्बंध असतील की कशाप्रकारचा लॉकडाऊन असेल?

आयुक्त इकबाल चहल: जरी दुसरी लाट आली तरी मुख्यमंत्र्यांनी रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लावली. तेवढंच एक बंधन लावलं आहे. हे वगळता सगळे व्यवहार आपल्याकडे सुरु आहेत. लोकल ट्रेन, बसेस देखील सुरु आहेत. आपण 8 वाजेनंतर संचारबंदी का घातली आहे की, तेव्हा हॉटेल, मॉल्स आणि मार्केटमध्ये गर्दी अधिक होऊ नये यासाठी. आपण हे सर्व टाळलं तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही.

त्याच्या पलीकडे आपण एकही नवीन बंधन लावलेलं नाही. आता जे काही लक्षण नसलेले लोक आहेत ते पॉझिटिव्ह असून देखील बाहेर फिरतात त्यांना आम्ही स्टॅम्प मारणं सुरु केलं आहे. स्टॅम्प केलेले रुग्ण घराबाहेर पडले तर त्यांच्याविरोधात आम्ही गुन्हा दाखल करु.

कोणत्याही इमारतीत 5 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास आम्ही बिल्डिंग सील करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारच्या बंधनामुळे आणि सर्वांच्या सहकार्याने आपण लॉकडाऊनला पुढे ढकलू शकतो किंवा टाळू शकतो.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चिन्हं आहेत का?

प्रश्न: घरोघरी जाऊन लसीकरण करावं या तुमच्या मागणीला अद्याप तरी केंद्र सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे लसीकरण वाढविण्यासाठी काय उपाय करणार आणि 45 वर्षांवरील लोकांना लसीकरण ही अट मुंबईत शिथिल करण्याचा आपला काही प्रयत्न आहे का?

आयुक्त इकबाल चहल: केंद्र सरकारचं आम्हाला पूर्ण सहकार्य आहे. आज 59 खासगी हॉस्पिटल असे आहेत की जे आधी पात्र नव्हते पण आमच्या विनंतीनंतर केंद्र सरकारने या सर्व रुग्णालयांना विशेष परवानगी दिली. तिथे लसीकरण सुरु झालं आहे. मुंबईत आपण दररोज ४५ हजार जणांना लस देत आहोत. पण खासगी रुग्णालयात लसीकरण वाढविण्यात यावं असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे एक लाख लसीकरण हे आमचं टार्गेट नक्की पूर्ण होईल.

लोकलवर टांगती तलवार, मुंबईत पुन्हा लॉकडाऊन?

प्रश्न: घरोघरी लसीकरण याची तुम्हाला किती शक्यता वाटते?

आयुक्त इकबाल चहल: केंद्र सरकारने असा निर्णय हा संपूर्ण देश पातळीवर घ्यायचा आहे. आम्ही काटेकोरपणे केंद्र शासनाचे आदेश पाळतो आणि जे काही आदेश केंद्र सरकारकडून आम्हाला येणार त्यानुसार आम्ही अंमलबजावणी करु.

Exclusive: मुंबईत तूर्तास लॉकडाऊन नाही: मुंबई महापालिका आयुक्त

प्रश्न: मुंबईत जूनपर्यंत कोरोनाची लाट अटोक्यात येण्याची शक्यता आहे का?

आयुक्त इकबाल चहल: तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ही लाट येऊन 50 दिवस झाले आहेत. येत्या 30 ते 35 दिवसात ही लाट अटोक्यात येईल असं मला वाटतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT