आमदाराने 9 तासात तीन वेळा बदलला पक्ष अन् सुरु झाला पक्षांतर बंदी कायद्याचा प्रवास

मुंबई तक

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या अगोदरही नारायण राणे, राज ठाकरे, छगन भुजबळ यांनी बंड केले होते. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या आमदरांना फोडत गुवाहटीमधिल एका हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिंदेंच्या या बंडानंतर इतिहासातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने पक्षांतर बंदी कायद्यावर चर्चा केली जातीये. १९८५ ला राजीव […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या अगोदरही नारायण राणे, राज ठाकरे, छगन भुजबळ यांनी बंड केले होते. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या आमदरांना फोडत गुवाहटीमधिल एका हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिंदेंच्या या बंडानंतर इतिहासातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने पक्षांतर बंदी कायद्यावर चर्चा केली जातीये.

१९८५ ला राजीव गांधी पंतप्रधान असताना पक्षांतर बंदी कायदा पारित करण्यात आला होता. परंतु पक्षांतराची पहिली ठिणगी १९६७ मध्ये हरियाणामध्ये पडली होती. ‘आया राम गया राम’ हा वाक्यप्रचार आपण अनेकदा ऐकलेला आहे, परंतु त्याचा उगम हा हरियाणातील एका राजकीय घटनेशी आहे आणि त्याच घटनेबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

असा जन्म झाला ‘आया राम गया राम’ वाक्यप्रचाराने

‘आया राम गया राम’ ही भारतीय राजकारणातील नवीन टर्म नाहीये. ही टर्म मुख्यत्वे अशा नेत्यांसाठी वापरली जाते जे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत असतात. अनेकदा हा शब्द बंडखोर आमदार, खासदारांसाठी देखील वापरतला जातो. हरियाणाच्या एका आमदाराने एका दिवसात तीन वेळा पक्ष बदलला आणि ‘आया राम, गया राम’ या वाक्यप्रचाराने जन्म घेतला, ज्याला इंग्रजीत ‘पार्टी-स्विचिंग’ असे म्हणतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp