Abhijeet Bichukale पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात; आता कुठून भरला अर्ज? - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Abhijeet Bichukale पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात; आता कुठून भरला अर्ज?
बातम्या राजकीय आखाडा

Abhijeet Bichukale पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात; आता कुठून भरला अर्ज?

Abhijeet Bichukle files nomination for kasba assembly by poll form pune

पुणे : कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस आणि भाजपकडून तगडे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना तिकिट दिलं आहे तर भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय हिंदू महासंघ, संभाजी ब्रिगेड असे पक्षांनीही इथून निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरु केली आहे. तर काँग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी केली आहे. (Abhijeet Bichukale has contested elections from President to Lok Sabha and Legislative Assembly. However, they could not win any of these elections.)

याच उमेदवारांच्या भाऊगर्दीत आता बिग बॉस फेम आणि निवडणूक लढण्यासाठी ओळख मिळविलेले अभिजीत बिचुकले यांनीही उडी घेतली आहे. मंगळवारी त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदापासून ते लोकसभा आणि विधानसभेच्या विविध ठिकणांहुन निवडणुका लढविल्या आहेत. मात्र, यापैकी कोणत्याही निवडणुकीत ते विजयी होऊ शकलेले नाहीत.

Mumbai Airport अदानींकडे कसे गेले? राहुल गांधींनी सांगितली क्रॉनॉलॉजी

अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बिचकुले म्हणाले, मी विधानभवनात किंवा संसदेत जात नाही, तोवर निवडणूक लढवायची, ही माझी भूमिका आहे. मी २ वर्षांपासून कसबा पेठेत राहतो. मग या लोकांचे प्रश्न माझे नाहीत का? मध्यंतरी ‘कसबा भकास झाला’ असे काही बॅनर्स लागले होते. आता त्याचं भकास कसब्याला सजवायला मी येत आहे, असं उत्तर त्यांनी दिलं.

अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. २०१९ मध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील निवडणूक लढवली होती. त्यानंतर झालेली पंढरपूर-मंगळवेढ्याची पोटनिवडणूकही लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांना केवळं १३७ मतं पडली होती. अभिजीत बिचुकले हे बिग बॉस मराठी-२ चे स्पर्धक म्हणूनही ओळखले जातात.

Rahul Gandhi Speech : अदाणींवरून मोदींना घेरलं! गांधींनी चढवला हल्ला

पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले अभिजीत बिचुकले हे सातारा नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. पण काही वर्षांपासून ते राजकारणात नशीब आजमावत आहेत. २००४ पासून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सातारा शहरात गुरुवार पेठ परिसरात त्यांचं घर आहे. २०१९चा मुख्यमंत्री मीच ठरवणार असंही या बॅनरवर लिहिलं होतं. तर त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘भारताचे राष्ट्रपती म्हणून तुम्ही माझेच नाव घोषित करावे,’ अशी विनंती केली होती.

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!