Bageshwar Baba विरोधात संताप! मनसे आक्रमक, अंधारेंचा फडणवीसांवर हल्ला - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Bageshwar Baba विरोधात संताप! मनसे आक्रमक, अंधारेंचा फडणवीसांवर हल्ला
बातम्या राजकीय आखाडा

Bageshwar Baba विरोधात संताप! मनसे आक्रमक, अंधारेंचा फडणवीसांवर हल्ला

Bageshwar Baba controversy : गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धीरेंद्र शास्त्री (dhirendra shastri) महाराज ऊर्फ बागेश्वर बाबाने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांबद्दल संतापजनक विधान केलं आहे. (dhirendra shastri on tukaram maharaj) या विधानावरून महाराष्ट्रात संतप्त पडसाद उमटले असून, आता मनसेनं (MNS) या वादात उडी घेतलीये. दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी फडणवीस आणि भाजप नेत्यांवर टीकास्त्र डागलंय. (bageshwar baba controversial statement on sant tukaram maharaj)

बागेश्वर बाबा संत तुकाराम महाराजांबद्दल काय बरळले?

बागेश्वर बाबाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते म्हणत आहेत की, “संत तुकाराम महाराष्ट्रातील एक संत होते. त्यांची पत्नी त्यांना दररोज काठीने मारहाण करत होती. एका व्यक्तीने त्यांनी याबद्दल विचारलं की, ‘तुम्ही दररोज बायकोचा मार खाता, तुम्हाला त्याची लाज वाटत नाही का?’ त्यावर तुकाराम महाराज त्या व्यक्तीला म्हणाले की, ‘मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे.”

“त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, ‘अरे वा, प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. भक्तीत लीन झालोच नसतो. पत्नीच्याच प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्यानेच मला देवाची सेवा करण्याची संधी मिळाली”, असं बागेश्वर बाबा या व्हिडीओत त्यांच्या अनुयायांना सांगत आहे.

सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले धिरेंद्र शास्त्री कोण आहेत?

मनसेची शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी

संत तुकाराम महाराजांबद्दल बागेश्वर बाबाने केलेल्या या संतापजनक वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या विधानांचा निषेध करताना बागेश्वर बाबावर कारवाई करण्याची मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केलीये.

मनसेच्या ट्विटर हॅण्डलवर ट्विट करण्यात आलंय. “जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल त्या बागेश्वरने जे अकलेचे तारे तोडलेत, त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध नोंदवत आहे. ह्या भोंदू माणसाची असली विधान खपवून घेतली जाणार नाहीत. महाराष्ट्र सरकारने अशा भोंदू बाबाविरोधात कडक कारवाई करावी,” अशी मागणी मनसेने सरकारकडे केली आहे.

बागेश्वर महाराज, आम्ही तुम्हाला माफ केले; देहू विश्वस्तांची भूमिका काय?

बागेश्वर बाबाच्या विधानावर देहू संस्थानाकडूनही भूमिका मांडण्यात आली आहे. देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी बागेश्वर बाबाच्या विधानावर भाष्य केलं आहे.

Bageshwar Dham: धीरेंद्र शास्त्रींना जीवे मारण्याची धमकी

“तुकोबांना घास भरवल्याशिवाय जिजाबाई अन्न, पाणी घेत नव्हत्या. डोंगराच्या ठिकाणी नामस्मरणात असलेल्या तुकोबांना त्या भाकरी खाऊ घालून यायच्या. पतीव्रता त्यागाची भूमिका त्यांची होती. त्यामुळे त्यांच्यावर चुकीचं वक्तव्य करू नयेत”, असं मोरे यांनी म्हटलंय.

“अगोदर सविस्तर माहिती घ्यावी, मगच बोलावे. वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे. बंबाजी, रामेश्वर भट्ट यांना माफ करणारा आहे. बागेश्वर महाराज आम्ही तुम्हाला माफ करतो. क्षमा करणे हा वारकऱ्यांचा सर्वात मोठा गुण आहे. संतावर चुकीचे वक्तव्ये करू नयेत. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना आवाहन करतो की यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. संतावर कोणी काही बोलू नये म्हणून यावर कायदा बनवावा. जेणेकरून अशा गोष्टीना पायबंद बसेल”, अशी भूमिका देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी मांडली.

सुषमा अंधारे यांची फडणवीसांवर टीका

सुषमा अंधारे यांनी फडणवीसांसह भाजपवर निशाणा साधला आहे. “देवेंद्रजीसह भाजपच्या तमाम नेत्यांचा गजनी झालाय का? बागेश्वर महाराष्ट्रातल्या संतश्रेष्ठांचा अपमान करत असताना आता तुषार भोसले, मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी सोयीस्कर मन बाळगून का बसले असतील बरे? देवेंद्र फडणवीसजी गृहखातं तुमच्या कडेच आहे ना?”, असा खोचक सवालही सुषमा अंधारेंनी केला आहे.

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!