फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणू हे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखं-शरद पवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातून फॉक्सकॉनसारखा प्रकल्प गुजरातला जाणं हे दुर्दैवी आहे. यापेक्षा आणखी मोठा प्रकल्प आणला जाईल असं आश्वासन देणं किंवा आमीष दाखवणं म्हणजे रडणाऱ्या लहान मुलाची समजूत काढण्यासारखं आहे असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. गुजरातला प्रकल्प गेला आहे त्यामुळे आता या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासारखं काही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला तर त्याचं स्वागतच आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

फॉक्सकॉनबाबत काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?

फॉक्सकॉन प्रकल्पावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तळेगावचा जो स्पॉट फॉक्सकॉनच्या प्रकल्पासाठी निवडला गेला होता. ती जागा योग्य होती. कारण त्याच्या आजूबाजूला चाकण आणि रांजणगाव एमआयडीसी आहे. ती ऑटोमोबाईलसाठी अनुकूल आहे. इथं प्रकल्प असता तर कंपनीचा फायदेशीर ठरला असता. त्यामुळेच तळेगाव हीच जागा योग्य होती. महाराष्ट्रातून प्रकल्प जाणं दुर्दैवी आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. जे झालं ते झालं आता चर्चा बंद करू असंही पवार यांनी म्हटलं आहे.

वेदांताचा प्रकल्प येईलच याची काही खात्री नाही

वेदांताचा प्रकल्प गुजरातला जाणं हा काही या कंपनीचा पहिला अनुभव नाही. हा प्रकल्प वेदांता ग्रुपचा आहे. त्याचे मालक अग्रवाल यांनी निर्णय घेतला. त्यात काही नाविन्य नाही. या देशात एक महत्त्वाचा प्रोजेक्ट रत्नागिरीला करायचा निर्णय झाला होता. तो प्रकल्प वेदांता ग्रुपच करणार होता. नंतर ठरवून काही स्थानिक विरोध झाला आणि त्यानंतर तो प्रोजेक्ट चेन्नईला गेला. ही जुनी गोष्ट आहे. वेदांताकडून हे पहिल्यांदा झालेलं नाही. त्यामुळे वेदांताचा प्रकल्प येत असेल तर तो शेवटपर्यंत येईल की नाही याची खात्री मला तरी देता येत नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवारांनी उदय सामंत, एकनाथ शिंदेंचं शहाणपणच काढलं

उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार असल्याचा ठपका ठेवला आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात उदय सामंत आणि एकनाथ शिंदे मंत्री होते. आणि ते आता आरोप करताहेत की मागच्या सरकारने काहीही केलेलं नाही. ज्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते, त्याच मंत्रिमंडळाने दुर्लक्ष केल्याचं ते म्हणताहेत, तर मला असं वाटतं हे काही शहाणपणाचं लक्षण नाहीये, असं म्हणत शरद पवारांनी उदय सामंत आणि एकनाथ शिदेंना खडेबोल सुनावले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT